प्रेयसीला ऍसिड,पेट्रोल टाकून जाळणाऱ्या नराधमाला अटक.. - When she got married, she went with her boyfriend, he was the one who killed her. | Politics Marathi News - Sarkarnama

प्रेयसीला ऍसिड,पेट्रोल टाकून जाळणाऱ्या नराधमाला अटक..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

बीड ःपुणे येथे एकत्र राहणाऱ्या व दुचाकीवरुन गावाकडे परतत असताना वाटेतच प्रेयसिच्या अंगावर पेट्रोल व ॲसिड टाकून पेटवून देणाऱ्या नराधमास बीड पोलिसांच्या मंदतीने नांदेड पोलिसांनी देगलूर येथून अटक केली आहे.  

बीड ःपुणे येथे एकत्र राहणाऱ्या व दुचाकीवरुन गावाकडे परतत असताना वाटेतच प्रेयसिच्या अंगावर पेट्रोल व ॲसिड टाकून पेटवून देणाऱ्या नराधमास बीड पोलिसांच्या मंदतीने नांदेड पोलिसांनी देगलूर येथून अटक केली आहे.  

सावित्रा डिंगबर अंकूरवर (वय २२, रा. शेळगाव, ता. देगलुर, जि. नांदेड) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर अविनाश रामकीसन राजुरे (वय २५) असे आरोपीचे नाव असून तो मृत तरुणीच्या गावातीलच आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगावातील सावित्रा अंकुरवार आदीवासी समाजातील विवाहित होती. मात्र, तीचे व अविनाश राजूरे यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यातूनच ती घर सोडून अविनाश सोबत गेली. मागच्या वर्षभरापासून पुण्यात ते एकत्र राहत होते. 

शुक्रवारी (ता. १३) दोघेही पुण्याहुन दुचाकीवरुन गावी निघाले. उशिर झाल्याने तालुक्यातील येळंब (घाट) परिसरात एका खडी क्रेशर जवळ दोघेही मुक्कामास थांबले. शनिवारी (ता. १४) पहाटेच्या सुमारास अविनाश राजूरे याने सावित्री अंकुरवार हिचा गळा दाबून तिच्या अंगावर अॅसीड व नंतर पेट्रोल टाकून पेटवून दिले आणि तो पसार झाला. 

शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारात अविनाश राजूरे याने सावित्री अंकुरवार हिला ॲसिड व पेट्रोल टाकून पेटवून दिले आणि पळ काढला. रस्त्याच्या काही अंतरावर खडी क्रेशर येथे ही घटना घडली. त्यामुळे लोकांच्या हा प्रकार लक्षात आला नाही. विव्हळत असलेल्या या तरुणीचा आवाजही रस्त्यापर्यंत पोचत नव्हता. शनिवारी दुपारी दोन वाजता ही घटना लक्षात आली. तोपर्यंत तरुणी विव्हळतच पडलेली होती.

या घटनेने राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. आरोपीला तात्काळ अटक करून कारवाई करा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी देखील आरोपीच्या अटकेसाठी काही पथक नांदेड आणि बीड जिल्ह्यात पाठवली होती. अखेर बीड पोलिसांच्या मदतीने नांदेडच्या पथकाला आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख