हम नही सुधरेंगे.. मास्क न वापरल्यामुळे औरंगाबादकरांनी भरला ३६ लाखांचा दंड.. - We will not improve .. Aurangabadkar pays Rs 36 lakh fine for not wearing mask .. We Translations of we Frequency आम्ही we, ourself Definitions of we Pronoun 1 used by a speaker to refer to himself or herself and one or more other people considered togeth | Politics Marathi News - Sarkarnama

हम नही सुधरेंगे.. मास्क न वापरल्यामुळे औरंगाबादकरांनी भरला ३६ लाखांचा दंड..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

मे ते २० आॅक्टोबर या सहा महिन्याच्या काळात अशा उघड्या तोंडांनी फिरणाऱ्या वाहनचालक व नागरिकांकडून महापालिकेने शहरात तब्बल ३५ लाख ७८ हजार एवढा दंड वसुल केला आहे. दंड आकरूनही विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे.

औरंगाबाद ः कोरोनाच्या जागतिक महामारीचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला. लोखो नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला तर हजारोंना आपले प्राण गमवावे लागले. राज्य शासन, आरोग्य विभागाकडून वारंवार मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. लस नाही तोपर्यंत मास्क हाच कोरोना राेखण्याचा उपाय असल्याचे स्वतः मुख्यमंत्री सांगत आहेत. आवाहनाला लोक जुमानत नाही म्हटल्यावर मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा प्रयोग झाला, पण तो ही फसला. औरंगाबादकरांनी मे ते आॅक्टोबर या सहा महिन्यात मास्कच्या दंडापोटी तब्बल ३६ लाखांचा दंड भरल्याचे समोर आले आहे.

मुंबईनंतर पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि औरंगाबाद या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्याचे पहायला मिळाले होते. मराठवाड्यात कोरोनाचे आतापर्यंत ३६ हजाराहून अधिक रूग्ण हे औरंगाबाद जिल्ह्यात आढळले. तर हजाराहून अधिक जणांचा बळी या महामारीने घेतला. लाॅकडाऊन, जनता कर्फ्यू, कडक लाॅकडाऊन असे सगळे प्रयोग केल्यानंतर, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका आणि आरोग्य विभागाने शहरात अॅन्टीजन टेस्टची संख्या वाढवत ट्रेस, टेस्ट आणि ट्रीटची संकल्पना राबवली.

यातून कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यात महापालिकेला यशही आले. मृत्यूदर झपाट्याने खाली आला. नोकरदार, कामगार, व्यापारी, व्यावसायिक, फळ विक्रेते, दूध विक्रेते अशा सगळ्यांच्याच चाचण्या करण्यात आल्या. मिशन बिगीन अगेन अंतर्गत टप्याटप्याने शहरातील दैनंदिन व्यवहार देखील सुरू झाले. पण ते सरु करत असतांनाच प्रशासनाने शहरात मास्क बापरणे बंधनकारक केले. विना मास्क फिरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड आकारण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.

परंतु हम नही सुधरेंगे म्हणत, काही औरंगाबादकरांनी दंड भरणे पसंत केले, पण मास्क घातले नाही. मे ते २० आॅक्टोबर या सहा महिन्याच्या काळात अशा उघड्या तोंडांनी फिरणाऱ्या वाहनचालक व नागरिकांकडून महापालिकेने शहरात तब्बल ३५ लाख ७८ हजार एवढा दंड वसुल केला आहे.  

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पदभार स्वीकारताच मास्कच्या बाबती कडक नियम केले होते. मास्क न वापरणाऱ्यांकडून पाचशे रुपयांचा दंड आकारला जाईल आणि त्याला मास्क देखील दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले होते. दंड आकरूनही विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख