पवारांच्या भूमिकेमुळे मराठा आरक्षण आंदोलनाचे खच्चीकरण -आमदार विनायक मेटे 

" देशातील विविध राज्यांत आरक्षणाची आंदोलने सुरु आहेत. आर्थिक निकषावरच आरक्षण द्यावे या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेमुळे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या आंदोलनाला व संघर्षाला खिळ बसली आहे. आंदोलनाचे खच्चीकरण झाले आहे
Pawar-Mete
Pawar-Mete

बीड : " देशातील विविध राज्यांत आरक्षणाची आंदोलने सुरु आहेत. आर्थिक निकषावरच आरक्षण द्यावे या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेमुळे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या आंदोलनाला व संघर्षाला खिळ बसली आहे. आंदोलनाचे खच्चीकरण झाले आहे ,"असा आरोप  शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आणि  शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषदेत केला . 

 जर, आर्थिक निकषावर आरक्षण हवे तर मग सध्याचे प्रचलित आरक्षणाबाबतही शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही त्यांनी केले. शेती, सामाजिक, उद्योग आदि क्षेत्रांत शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याबद्दल आदर, प्रेम आणि आपुलकी असल्याची पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.

 दोन दिवसांपूर्वी (ता. २१) पुणे येथे जागतीक मराठी अकादमीच्या व्यासपीठावर शरद पवार यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना आर्थिक निषकावर आरक्षण असावे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. यावर शुक्रवारी (ता. २३) श्री. मेटे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. 

"  मराठा आरक्षणाच्या मागणीवर आणि आंदोलनावर शरद पवार कायम गप्प राहीलेले आहेत. आघाडी सरकारच्या काळातही याबाबत मोठे आंदोलने झाल्यानंतरही त्यांनी कुठलीच भूमिका घेतली नव्हती. लोकसभेला झालेल्या मोठ्या पराभवाचा धसका घेत आघाडी सरकारने घाईत जाहिर केलेल्या मराठा आरक्षणाबाबतही त्यांनी कुठलेच मत व्यक्त केले नव्हते. मराठा आरक्षण मागणीसाठी समाजाचे लाखोंचे क्रांती मोर्चे निघत असतानाही शरद पवार यांनी कुठलीही भूमिका जाहिर केली नाही. " असा आरोप मेटे यांनी केला . 

" आता सरकार आरक्षण देण्याच्या प्रयत्नात आहे, राज्य मागासवर्गीय आयोग अहवाल सादर करण्याच्या तयारीत आहे, न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अशा वेळी त्यांनी ही भूमिका भूमिका घेण्याचे कारण काय?" असा सवालही आमदार मेटे यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षण नको का, आर्थिक निकषावर आरक्षण नको तर मग सध्याचे प्रचलित आरक्षण बंद करायचे का, याबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन श्री. मेटे यांनी केले. समाजातील गरिबांना आरक्षण हवेच असून ते ओबीसीमध्ये समावेश करुन द्यावे. सध्याच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले.

देशात आरक्षणाची चळवळ सुरु असलेल्या राज्यातील नेत्यांची रविवारी (ता. २५) दिल्लीत बैठक असून त्यामध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरणार असल्याचे आमदार मेटे यांनी सांगीतले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com