शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर हल्ला करणारा पाचवा आरोपी कट्टर शिवसैनिकच..

बाळासाहेब गुंजाळ या (Shivsena Activist) शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सोलापूरमधून सोमवारी रात्री अटक करण्यात आली.
Beed Shivsena
Beed Shivsena Sarkarnama

बीड : शिवसेना उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप यांच्यावर ३० सप्टेंबर रोजी गावाकडून मोटारासायकलवर येतांना चार ते पाच जणांनी जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणात पोलिसांना आधीच चार आरोपींना अटक केली. आता यातील पाचव्या आरोपीला देखील पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून तो कट्टर शिवसैनिक असून नगरसेविकेचा पती असल्याचे समोर आले आहे.

बाळासाहेब गुंजाळ या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सोलापूरमधून सोमवारी रात्री अटक करण्यात आली. काकु-नाना विकास आघाडीच्या नगरसेविका अश्विनी गुंजाळ यांचा तो पती आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप यांच्यावर गावाकडून बीडला येत असतांना हल्ला झाला होता.

मोटारसायकलवरून आलेल्या चार-पाच जणांनी जगताप यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत जवळच असलेल्या तलावात टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जगताप यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर रस्त्याने जाणारे काही लोक त्यांच्या मदतीला धावल्यामुळे हल्लेखोर पळून गेले होते.

या हल्ला प्रकरणात ३ सप्टेंबर रोजी दत्ता जाधव व इश्वर देवकर या बीडमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस चौकशीत आणखी काही नावे बाहेर आल्यानंतर बाबुलाल पवार, अंबादास विटकर या दोन आरोपींना देखील बीडमधूनच ताब्यात घेण्यात आले होते. परंतु या हल्ल्यामागे आणखी काही आरोपी असण्याची शक्यता वर्तवली जात होती.

त्या दृष्टीने पोलिसांनी तपास केला आणि शिवसेनेचाच कट्टर कार्यकर्ता असणाऱ्या बाळासाहेब गुंजाळ याचे नाव समोर आले. सोमवारी रात्री गुंजाळ एका हाॅटेलमध्ये असल्याच्या माहितीवरून पोलिसाच्या पथकाने तिथे धाव घेऊन गुंजाळ याला पकडले.

Beed Shivsena
शिवसेनेत काय चाललंय, काही नेते नैराश्यात, तर काही कायद्याच्या कचाट्यात

त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात दिल्यानतर मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. बाळासाहेब गुंजाळ याची पत्नी अश्विनी गुंजाळ काकु-नाना विकास आघाडीच्या चिन्हावर निवडून आलेल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com