आठ दिवसांत दहा लाख, महिनाभरात नोकरी; तरच सरकारचे अभिनंदन 

मराठा समाजाच्या इतर मागण्या देखील आहेत, पण प्रामुख्याने बलिदान देणाऱ्या ४२ तरुणांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये आणि एका सदस्याला सरकारी नोकरी याला आम्ही प्राधान्य दिले. निर्णय झाला असला तरी घोषणे प्रमाणे सरकारने येत्या ८ दिवसांत या कुटुंबियांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा केली पाहिजे. तसेच या कुटुंबातील सदस्याला एका महिन्यात नोकरीवर रूजू करून घेतले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने सरकारने मागण्या मान्य केल्या असे म्हणता येईल.
maratha kranti thok morcha press news aurangabad
maratha kranti thok morcha press news aurangabad

औरंगाबाद ः मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या राज्यातील ४२ तरूणांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि एका सदस्याला नोकरी देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. पण तुर्तास आम्ही सरकारचे किंवा मंत्र्यांचे अभिनंदन करणार नाही, येत्या आठ दिवसांत हुत्तात्मा झालेल्या मराठा तरुणांच्या कुटुंबियांच्या खात्यात दहा लाख रूपये व महिनाभरात एका सदस्याला नोकरीवर रुजू करून घेतले जात नाही, तोपर्यंत आम्ही सरकारचे अभिनंदन करणार नाही. दोन्ही गोष्टींची पुर्तता केली नाही, तर ठरवल्या प्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्‍थानासमोर आम्ही ठिय्या आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील ४२ तरुणांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. या तरुणांच्या कुटुंबियांना दहा लाखांची आर्थिक मदत आणि एका सदस्याला सरकारी नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय यापुर्वी घेण्यात आला होता. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही.

याशिवाय मुंबईच्या आझाद मैदानात ४७ दिवस आंदोलन करणाऱ्या विद्यार्थांना न्याय व नोकरी मिळावी या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने औरंगाबादेत ५ आॅग्सटपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. अखेर राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेत काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हुतात्मा झालेल्या ४२ तरूणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाखाची मदत व एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. रमेश केरे पाटील म्हणाले, मंत्रीमंडळ बैठकीत एकनाथ शिंदे व इतर मंत्र्यांनी काल निर्णय जाहीर केला असला तरी त्याची अंमलबजावणी होणे महत्वाचे आहे. त्यामुळे केवळ घोषणा झाली म्हणून आम्ही हुरळून जाणार नाही, किंवा सरकारच्या अभिनंदनाची घाई देखील करणार नाही.  कारण यापुर्वी देखील निर्णय घेतले गेले, पण अमंलबजावणी झाली नाही आणि म्हणून आमच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली. 

मराठा समाजाच्या इतर मागण्या देखील आहेत, पण प्रामुख्याने बलिदान देणाऱ्या ४२ तरुणांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये आणि एका सदस्याला सरकारी नोकरी याला आम्ही प्राधान्य दिले. निर्णय झाला असला तरी घोषणे प्रमाणे सरकारने येत्या ८ दिवसांत या कुटुंबियांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा केली पाहिजे. तसेच या कुटुंबातील सदस्याला एका महिन्यात नोकरीवर रूजू करून घेतले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने सरकारने मागण्या मान्य केल्या असे म्हणता येईल.

जर असे झाले नाही, तर आमच्या आंदोलनाची पुर्ण तयारी झालेली आहे. मराठा समाजाच्या अजूनही अनेक मागण्या आहेत, त्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे. त्यामुळे वरील प्रमाणे सरकारकडून निर्णयाची अमंलबजाणी झाली नाही, तर आठ दिवसांनी आम्ही या कुटुंबियासह मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा रमेश केरे पाटील, अप्पासाहेब कुठेकर यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com