विश्वासघाताने आलेल्या सरकारला मराठवाडा पदवीधरमध्ये विजय मिळवून धडा शिकवा.. - Teach the treacherous government a lesson by winning in Marathwada | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

विश्वासघाताने आलेल्या सरकारला मराठवाडा पदवीधरमध्ये विजय मिळवून धडा शिकवा..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

जनतेने राज्यात भाजपचे १०५ आमदार निवडूण देत सर्वात मोठा पक्ष बनवले. लोकांना राज्यात भाजपचीच सत्ता हवी आहे. त्पामुळे प्रत्येक पदवीधरला केंद्रावर घेऊन जाणे आणि मतदान करवून घेणे गरजेचे आहे. ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे, त्यांनी ती कुठल्याही परिस्थीतीत पार पाडून बोराळकर यांना मोठ्या मताधिक्यांने निवडूण आणायचे आहे.

लातूर ः ज्या पक्षाला जनतेने नाकारले, अशा पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन धोक्याने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. आपला मित्र पक्ष असलेल्या पक्षाने देखील धोका दिला. याचा राग जनतेच्या मनात आहे, भाजप देखील याचा वचपा काढण्यासाठी उत्सूक आहे. मराठवाडा पदवीधर निवडणूकीच्या निमित्ताने ही संधी चालून आली आहे. शिरीष बोराळकरांना विजयी करून सरकारचा वचपा काढा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

भाजपा महायुतीचे औरंगाबाद विभाग (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर येथे आयोजि पदवीधर मेळाव्यात दानवे बोलत होते. ही निवडणूक एकट्या शिरीष बोराळकरांची आहे असे समजु नका. ही निवडणूक विश्वासघाताने आलेल्या सरकारला धडा शिकवणारी आहे. जनतेने राज्यात भाजपचे १०५ आमदार निवडूण देत सर्वात मोठा पक्ष बनवले. लोकांना राज्यात भाजपचीच सत्ता हवी आहे. 

त्पामुळे प्रत्येक पदवीधरला केंद्रावर घेऊन जाणे आणि मतदान करवून घेणे गरजेचे आहे. ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे, त्यांनी ती कुठल्याही परिस्थीतीत पार पाडून बोराळकर यांना मोठ्या मताधिक्यांनी निवडूण आणायचे आहे, असे आवाहन देखील दानवे यांनी यावेळी केले. ही पदवीधर निवडणूक जिंकून भविष्यातील निवडणूकीच्या  विजयाची मुहूर्तमेढ आपल्याला रोवायची आहे.

राज्यात भाजपची सत्ता असतांना आपण मराठवाडा वाॅटरग्रीड, डीएमआयसी, ड्रायपोर्ट, समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार अशी अनेक विकासाची कामे केली असल्याचे सांगत पदवीधर मतदार देखील याची पावती आपल्याला नक्कीच देतील, असा विश्वास देखील दानवे यांनी व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख