मराठवाड्याला ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यासाठी इस्त्रायलशी चर्चा

इस्त्रायलमध्ये झालेल्या जलक्रांतीच्या धर्तीवर मराठवाड्यात त्यापद्धतची यंत्रणा राबवता येईल का याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मेकोरेट कन्सल्टंट, काऊंसिल जनरल ऑफ इस्त्रायल यांनी सहकार्य करण्यास सहमती दर्शवली. तसेच एक संयुक्त अभ्यास गट स्थापन करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.
jaynt patil meeting with istriels deligation for irigation news
jaynt patil meeting with istriels deligation for irigation news

औरंगाबाद ः सातत्याने दुष्काळाशी सामना कराव्या लागणाऱ्या मराठवाड्यातील शेतीला ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा करण्या संदर्भात इस्त्रायलशी जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांच्यासह मराठवाड्यातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून नुकतीच चर्चा केली. 

दुष्काळग्रस्त मराठवाड्याला ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवण्याबाबत मेकोरेट कन्सल्टंट, काऊंसिल जनरल ऑफ इस्त्रायल यांच्या सोबत नुकतीच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. 

इस्त्रायलमध्ये झालेल्या जलक्रांतीच्या धर्तीवर मराठवाड्यात त्यापद्धतची यंत्रणा राबवता येईल का याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मेकोरेट कन्सल्टंट, काऊंसिल जनरल ऑफ इस्त्रायल यांनी सहकार्य करण्यास सहमती दर्शवली. तसेच एक संयुक्त अभ्यास गट स्थापन करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.

बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव श्री. घाणेकर, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे संचालक डॉ. एन. व्ही. शिंदे व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच इस्त्राईलचे प्रतिनिधी म्हणून  याकोव, निलरोड कलमार,  अनय जोगलेकर,  डिगो बर्जर, आदी उपस्थित होते.

ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. ही वापरताना जमिनीचा दर्जा, पिकांची जात, पिकांचे स्वरूप, बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षात घेऊन नंतर गरजेनुसार पॉलिथीनच्या नळ्यांचे जाळे पसरवून थेंब थेंब पाणी दिले जातेे. ठिबक सिंचनाचा शोध इस्त्रायलमध्ये लावण्यात आला होता.

या पद्धतीत,जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते. पश्चिम, उत्तर महाराष्ट्रात याचे प्रमाण अधिक दिसून येते. त्या तुलनेत मराठवाड्यात मात्र ठिबक सिंचनाचे प्रमाण अल्प आहे. 

सातत्याने दुष्काळाशी लढा देणाऱ्या मराठवाड्यात ठिबकचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीने प्रयत्न सुरू केले आहेत.त्या दृष्टीने इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांसोबत झालेली बैठक महत्वाची समजली जाते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com