आज रस्त्यावर उतरलो, उद्या मंत्रालयात घुसू ; गोस्वामींच्या अटकेनंतर भाजप आक्रमक.. - Take to the streets today, enter the ministry tomorrow; BJP aggressive after Goswami's arrest | Politics Marathi News - Sarkarnama

आज रस्त्यावर उतरलो, उद्या मंत्रालयात घुसू ; गोस्वामींच्या अटकेनंतर भाजप आक्रमक..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

पत्रकार हा समाजाचा आरसा आणि देशाचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. पण राज्यातील तिघाडी सरकारकडून या चौथ्या स्तंभावरच घाला घालण्यात येत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पत्रकारांची मुस्काटदाबी सुरू असल्यामुळे आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत. पण या सरकारला आमचा इशारा आहे, आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, उद्या ्मंत्रालयावर येऊन तुमच्या दालनात घुसू.

औरंगाबाद ः रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज मुंबई पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने राज्यभरात निदर्शने करण्यात आली. औरंगाबादेत भाजपने अर्णब गोस्वामींची अटक म्हणजे चौथ्या स्तभांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याची टिका केली आहे. राज्यातील तिघाडी सरकारकडून पत्रकारांची मुस्काटदाबी केली जात आहे, असा आरोप करत आज आम्ही या विरोधात रस्त्यावर उतरलो आहोत, पण उद्या मंत्रालयात तुमच्या दालनात घुसून तुमचीही मुस्काटदाबी करू, असा इशारा दिला.

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर दुपारी शहरातील क्रांतीचौकात भाजपच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय केणेकेर, आमदार अतुल सावे यांच्यासह शेकडो पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर संजय केणेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना या अटकेचा निषेध केला. केणेकेर म्हणाले, अर्णब गोस्वामी यांना ज्या पद्धतीने पोलिसांनी घरून अटक केली, हा प्रकार म्हणजे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणयाचा प्रकार आहे.

पत्रकार हा समाजाचा आरसा आणि देशाचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. पण राज्यातील तिघाडी सरकारकडून या चौथ्या स्तंभावरच घाला घालण्यात येत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पत्रकारांची मुस्काटदाबी सुरू असल्यामुळे आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत. पण या सरकारला आमचा इशारा आहे, आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, उद्या ्मंत्रालयावर येऊन तुमच्या दालनात घुसू.

आमदार अतुल सावे यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर टिका करत अर्णब यांच्या अटकेचा निषेध केला. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांची अशा प्रकारे मुस्काटदाबी कदापी खपवून घेतली जाणार नाही. सरकार ज्या पद्धतीने पत्रकार व प्रसार माध्यमांशी वागत आहे, ते पाहता या तिघाडी सरकारने राज्यात आणीबाणी लागू केली आहे का? असा प्रश्न पडत असल्याचेही सावे म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख