बेरोजगारांना नोकरी आणि स्वयंरोजगारासाठी शाश्वत योजना हाच अजेंडा.. - Sustainable planning for jobs and self-employment for the unemployed is the agenda | Politics Marathi News - Sarkarnama

बेरोजगारांना नोकरी आणि स्वयंरोजगारासाठी शाश्वत योजना हाच अजेंडा..

तानाजी जाधवर
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

उर्जामंत्र्यांनीच पहिल्यांदा विज बिल माफ करण्याबाबत शब्द दिला होता. आता मात्र सक्तीने विज बिल वसुल करण्याची भुमिका सरकारने घेतली आहे. यामुळे सामान्य विज ग्राहकाच्या जखमेवर सरकारने मीठ चोळण्याचे काम केले आहे. खात्याचा कारभार चालवता येत नसेल, तर उर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लर्कची नोकरी करावी.

उस्मानाबाद ः बेरोजगारांना नोकरी व स्वयंरोजगारासाठी शाश्वत योजना निर्माण करण्याचा भाजपचा मानस असुन हाच निवडणुकीचा अजेंडा असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले. दरेकरांनी तुळजाभवानीचे दर्शन घेत आपल्या मराठवाडा दौऱ्याला आजपासून सुरवात केली. यावेळी त्यानी राज्य सरकारच्या विविध भुमिकांवर टिकाही केली.  

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ येत्या काही दिवसांत मराठवाड्यात भाजपचे अनेक नेते येणार आहेेत. दरेकर यांनी तुळजापूर येथून आपल्या दौऱ्याला सुरवात केली. यावेळी त्यांनी राज्यातील शाळा सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टिका केली. दरेकर म्हणाले ,शाळा सूरु करण्याबाबत सरकारची भुमिका गोंधळाची असुन मुंबई-ठाणे येथील शाळा सूरु करणार नसल्याचे सरकार सांगत आहे. उस्मानाबादमध्ये शाळा सूरु करणार का याविषयी अजुनही निर्णय झालेला नाही.जो न्याय मुंबईत तो इतर शहरात का नाही?

विजेच्याबाबतीतही सरकारने दिलेला शब्द पाळलेला नाही. उर्जामंत्र्यांनीच पहिल्यांदा विज बिल माफ करण्याबाबत शब्द दिला होता. आता मात्र सक्तीने विज बिल वसुल करण्याची भुमिका सरकारने घेतली आहे. यामुळे सामान्य विज ग्राहकाच्या जखमेवर सरकारने मीठ चोळण्याचे काम केले आहे. खात्याचा कारभार चालवता येत नसेल, तर उर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लर्कची नोकरी करावी असा टोलाही दरेकरांनी लगावला.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला मतदाराकडुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करतांनाच आमचा उमेदवार रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होईल, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.ठाम भुमिका घेऊन मराठवाड्याच्या प्रश्नावर लढण्यासाठी एका सक्षम आमदाराची गरज असुन त्यासाठी भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना मतदान करण्याचे अवाहनही त्यांनी केले.

Edited By ः Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख