शिवसेना खासदाराच्या पाठपुराव्याला यश; गडकरींकडून निधीचे आश्वासन

परभणी बायपासच्या रस्त्यासाठी जमीन संपादित करण्याला परवानगी दिली असून जमीन मालकांना पैसे देण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासनही गडकरी यांनी दिले आहे. या पत्रात दिले आहे. जमीन संपादनाचे हे काम ९० टक्के पूर्ण झाल्यावर या बायपास रस्त्याच्या कामाला चालू आर्थिक वर्षात मंजुरी दिली जाईल.
mp sanjay jadhav news parbhani
mp sanjay jadhav news parbhani

परभणी ः  बहुप्रतिक्षित परभणी बायपास रस्त्याच्या कामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले असल्याची माहिती परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांना दिली. संजय जाधव यांनी मानवत (जि.परभणी) ते नसरतपूर (ता.वसमत) या राष्ट्रीय महामार्गासाठी व परभणी बायपास (बाह्य वळण) रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता.

मतदारसंघातील अनेक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी निधी द्या, अशी मागणी ८ डिसेंबर २०१९ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून खासदार संजय जाधव यांनी केली होती. सदर राष्ट्रीय महामार्गाचे मजबुतीकरण व विस्तारीकरण तथा बाय पास रस्त्याच्या कामाचा यात प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला होता.

दरम्यान, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नुकतेच संजय जाधव यांना एक पत्र पाठवले असून या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे नमूद केले आहे. बायपास रस्त्याची एकूण लांबी १७.५ किलोमिटर असून त्यापैकी ८.५ किलोमिटर रस्ता चार पदरी तर ९ किलोमिटर रस्ता दोन पदरी असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, सध्या अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या मजबुतीकरणाचे मुख्य उद्दीष्ट आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या महामार्गाच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, सध्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या चालू असलेले काम पूर्ण झाल्यानंतर २०२०-२१ या आर्थिक वर्षात विस्तारीकरणाला मंजुरी दिली जाईल, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे परभणी बायपासच्या रस्त्यासाठी जमीन संपादित करण्याला परवानगी दिली असून जमीन मालकांना पैसे देण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासनही गडकरी यांनी दिले आहे. या पत्रात दिले आहे. जमीन संपादनाचे हे काम ९० टक्के पूर्ण झाल्यावर या बायपास रस्त्याच्या कामाला चालू आर्थिक वर्षात मंजुरी दिली जाईल.

भूसंपादनाचे काम युध्दपातळीवर करा- जाधव

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेऊन या रस्त्याच्या कामाला निधी देण्याचे आश्वासन दिल्यामुळे लवकरच या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला व बहुप्रतिक्षित असा परभणी बायपास रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असून परभणीच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागत आहे.  जिल्हा प्रशासनाने बायपास रस्त्याच्या हद्दीतील जमीन संपादनाचे काम लवकर आणि युद्धपातळीवर करावे, असे आवाहन संजय जाधव यांनी केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com