विद्यार्थ्याने गळफास घेतला; आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

मयत विवेक रहाडे याच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिट्ठी घरात आढळून आली. त्यात त्याने मराठा समाजाच्या आरक्षणाचा स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे म्हटले आहे. खासगी संस्थेत शिक्षण घेण्याची ऐपत नाही.केंद्र व राज्य सरकारने आता तरी समाजातील मुलांची कीव करावी असा उल्लेख केलेला आहे.
Beed student sucied news
Beed student sucied news

बीड: वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.३०) दुपारी दीड वाजता तालुक्यातील केतुरा येथे घडली.विवेक कल्याण रहाडे (१८, रा. केतुरा) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे तो तणावात होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या केली. तशी मृत्यूपूर्व चिठ्ठी असल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे.

शेतकरी कुटुंबातील विवेक बारावीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. वैद्यकीय प्रवेशासाठी त्याने १५ दिवसांपूर्वी नीट परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी त्याने चांगली तयारी केली होती. मात्र, आता आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे शुल्क भरून शिक्षण घेणे अवघड आल्याच्या तणावातून त्याने बुधवारी दुपारी स्वत:च्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक योगेश उबाळे, पो. ना. राम भंडाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्मयत विवेकचे मामा नवनाथ गणपती वांढरे (रा. केतुरा) यांच्या खबरीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पो.ना. राम भंडाणे करत आहेत. 

आरक्षण स्थगितीमुळे आत्महत्या

मयत विवेक रहाडे याच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिट्ठी घरात आढळून आली. त्यात त्याने मराठा समाजाच्या आरक्षणाचा स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे म्हटले आहे. खासगी संस्थेत शिक्षण घेण्याची ऐपत नाही.

केंद्र व राज्य सरकारने आता तरी समाजातील मुलांची कीव करावी असा उल्लेख केलेला आहे. कुटुंबीयांनी ही चिठ्ठी पोलिसांकडे दिली असून आरक्षण स्थगितीमुळे त्याने आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com