शिवबंधन बांधताच उस्मानाबादचे पालकमंत्री सक्रीय झाले

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा पालकमंत्र्यानी घेतल्याने प्रशासकीय यंत्रणा मात्र चांगलीच कामाला लागल्याचे दिसुन येत आहे. गेल्या काही दिवसापासुन कोरोनाच्या स्थितीमध्ये प्रशासनावर कोणाचे नियंत्रण नसल्याचा आरोप वारंवार होत होता. मात्र आता पालकमंत्री चांगलेच अॅक्टीव्ह झाल्याने प्रशासकीय यंत्रणेवर देखीलदबाव निर्माण झाला आहे.
gardiaun minister shankarrao gadakh news
gardiaun minister shankarrao gadakh news

उस्मानाबाद  ः शिवबंधन बांधताच पालकमंत्री शंकरराव गडाख सक्रीय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.तीन दिवसापुर्वीच जिल्ह्याचे पालकमंत्री गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधुन घेतले होते. त्यानंतर तातडीने त्यांनी जिल्ह्यामध्ये मुक्कामी दौरा आयोजीत केला असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये पोहचण्याचे नियोजन केले आहे..शिवबंधनाचा इफेक्ट जिल्ह्यासाठी चांगलाच उपयोगाचा ठरल्याची चर्चा या निमित्ताने सूरु झाली आहे.  

पालकमंत्री गडाख शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत, यावेळी वाशी तालुक्यातील कोरोना केअर सेंटमध्ये जाऊन त्रुयांनी रुग्णांच्या तब्येतीची विचारपुस केली, तेथे पुरवल्या जाणाऱ्या व्यवस्थेचीही माहीत घेतली. एवढेच नाही तर रुग्णांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचे काम केले. या शिवाय पुढे ते कळंब, उमरगा, लोहारा आदी तालुक्यामध्ये जाऊन आढावा घेणार आहेत.

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा पालकमंत्र्यानी घेतल्याने प्रशासकीय यंत्रणा मात्र चांगलीच कामाला लागल्याचे दिसुन येत आहे. गेल्या काही दिवसापासुन कोरोनाच्या स्थितीमध्ये प्रशासनावर कोणाचे नियंत्रण नसल्याचा आरोप वारंवार होत होता. मात्र आता पालकमंत्री चांगलेच अॅक्टीव्ह झाल्याने प्रशासकीय यंत्रणेवर देखील दबाव निर्माण झाला आहे.

या अगोदर पालकमंत्री गडाख जिल्ह्यामध्ये क्वचित येत असल्याची तक्रार करण्यात येत होती, त्यावर त्यानी स्पष्टीकरण देऊन यापुढे असे होणार नसल्याचे जाहीर केले होते. त्याचा प्रत्यय त्यानी कृतीमधुन दाखवुन देखील दिला आहे. विरोधकांनी पालकमंत्र्याविरोधात टिकेची झोड उठवत त्यांना लक्ष्य केले होते. पालकमंत्री हरवले आहेत अशी बॅनरबाजीही झाली. तेव्हा गडाख यांनी आपण जिल्ह्यात येत नसलो तरी आपले परिस्थितीवर लक्ष असल्याचे सांगत सुरू असलेल्या कामांची जंत्रीच मांडली होती.

शिवाय कौटुंबिक आजारपण आणि माझ्या दौऱ्याने प्रशासकीय यंत्रणेचा ताण वाढून कोरोनाच संसर्ग वाढण्याचा धोका होऊ नये म्हणून आपण येत नसल्याचे स्पष्टीकरण गडाख यांनी दिले होते. पंरतु आता या सगळ्या परिस्थितीतून बाहेर आल्यानंतर अपक्ष निवडुन आलेल्या  गडाख यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या कोट्यातुन त्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली होती,

भाजपने आपल्या संपर्कात सत्तेतील काही लोक असल्याचे सांगितल्यानंतर शिवसेनेने  गडाख याना शिवबंधन बांधल्याचे बोलले जाते.  शिवबंधन बांधल्यानंतर मात्र गडाख हे पालकमंत्री म्हणून चांगले अॅक्टीव्ह झाल्याचे दिसुन येत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com