जिल्ह्यात ओल्या दुष्काळासारखी परिस्थीती, पण पालकमंत्र्यांना पहायला वेळ नाही..

अतिवृष्टीमुळे नुकसान झाले तरी सरकारकडून कुठल्याच प्रकारची मदत जाहीर करण्यात आलेली नाही. पीक कर्ज वाटपाची यावर्षी परिस्थिती दयनीय होती.केवळ ५० टक्केच शेतकऱ्यांनापीक कर्ज मिळाले.परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडूनही शेतक-यांना तुटपूंजे कर्ज वितरीत केले गेले.जवळच्या बगलबच्चांनामात्र,हवे तेवढे पीक कर्ज देण्यात आले.
Ex Minister bone news parbhani
Ex Minister bone news parbhani

परभणी ः जिल्ह्यात खरीप हंगामाच्या वेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली, आता हातातोंडाशी घास आला तर अतिवृष्टीने सगळे धुवून नेले. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, पण पालकमंत्र्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा टोला माजी मंत्री तथा भाजप किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांनी नवाब मलिक यांना लगावला.

भाजप व किसान मोर्चाच्या वतीनो कृषी विधेयक व ओला दुष्काळाबाबत अनिल बोंडे यांनी शुक्रवारी परभणीत बैठक घेतली.यावेळी आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामराव वडकुते, बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महिला मोर्चाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा डॉ.विद्या चौधरी आदींची उपस्थिती होती. 

यावेळी बोंडे यांनी मुख्यमंत्री व आघाडी सरकारवर टिका केली..बोंडे म्हणाले, यावर्षी शेतक-यांना बॅंकानी पीक कर्ज देतांना हात आखडता घेतला, तर आता अतिवृष्टीमुळे नुकसान झाले तरी सरकारकडून कुठल्याच प्रकारची मदत जाहीर करण्यात आलेली नाही. पीक कर्ज वाटपाची यावर्षी परिस्थिती दयनीय होती.केवळ ५० टक्केच शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडूनही शेतक-यांना तुटपूंजे कर्ज वितरीत केले गेले.जवळच्या बगलबच्चांना मात्र,हवे तेवढे पीक कर्ज देण्यात आल्याचा आरोपही बोंडे यांनी केला.

खरीप हंगाम पेरणीच्या वेळी सोयाबीनचे बियाणे बोगस निघाले. त्यामुळे शेतक-यांवर दुबार पेरणीची वेळ आली. आता झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला असून शेतकरी उध्वस्त झाला आहे. ओल्या दुष्काळमुळे शेतक-यांचे आतोनात नुकसान झाले असून शेतक-यांसाठी हा संघर्षाचा काळ आहे.

आता शेतक-यांना मदत मिळाली नाही तर त्यांना रब्बीची पेरणी देखील करता येणार नाही, अशी स्थिती असल्याचेही बोंडे यांनी सांगितले. भाजपा सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजना, ठिबक सिंचन योजनेसह शेतक-यांच्या हिताच्या असलेल्या विविध योजना या महाविकास आघाडी सरकारने बंद केल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना स्मृतीभंश..

राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर असतांनाच उध्दव ठाकरे यांनी पाहणी दौ-यातून आपदग्रस्त कोरडवाहू शेतक-यांना हेक्टरी २५ हजार व बागायतदार शेतकऱ्यांना ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. परंतू सत्तेत येताच त्यांना या मागण्यांचा विसर पडला. त्यांना स्मृतीभंश झाला असून त्यांना च्यवनप्राशची गरज असल्याचा चिमटाही बोंडे यांनी यावेळी काढला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com