एसी केबीनमध्ये बसून केलेली मदतीची घोषणा म्हणजे, शेतकऱ्यांची चेष्टा..

मुळात नुकसानीचे पंचनामेच झालेले नाही, काही तरी थातूरमातूर आकडेवारी मागवून घेवून घेतलेला हा चुकीचा आणि शेतकऱ्यांची चेष्टा करणारा निर्णय आहे, आणि याचा मी निषेध करतो, असेही निलंगेकर म्हणाले.आम्ही पन्नास हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती, पण ३५ हजारांची जरी मदत केली असती तर शेतकऱ्यांना झालेले नुकसान निस्तारून रब्बीच्या पिकासाठी शेत तयार करून, बी-बियाणांसाठी आधार झाला असता.
mla sambhaji patil nilangekar angry news
mla sambhaji patil nilangekar angry news

निलंगा ः मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टी भागाचा दौरा केल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी घोषणा करत दोन दिवसांत मदत जाहीर करू असा शब्द दिला होता. त्यांच्या मदतीकडे आमच्यासह शेतकरी डोळे लावून होता. पण आज दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर करतांना बागायती, जिरायती जमीनीसाठी हेक्टरी १० आणि फळबागांसाठी २५ हजार एवढी तुटपुंजी मदत सरकारने जाहीर केली आहे. कशाच्या आणि कुठल्या आकड्यांच्या आधारावर ही घोषणा करण्यात आली आहे. एसी केबीनमध्ये बसून केलेली ही मदत याला मदत म्हणाताच येणार नाही, ही शेतकऱ्यांची चेष्टा असल्याचा संताप माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याचे सांगण्यात आले असले तरी यापैकी निम्मी रक्कम ही रस्ते, पुल याच्या दुरुस्ती आणि उभारणीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. मग उर्वरित पाच हजार कोटी रुपयांमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना दिलासा कसा देणार? असा सवाल देखील निलंगकेर यांनी उपस्थित केला.

निलंगेकर म्हणाले, हेक्टरी दहा आणि पंचवीस हजार रुपये मदत म्हणजे एकरी चार आणि दहा हजार एवढी होते. सध्या अतिवृष्टीमुळे शेतात झालेले नुकसान आणि वाहून आलेले साहित्य बाहेर काढायचे म्हटले तर आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो. त्यानंतर रब्बी पिकांसाठी शेत तयार करण्याचा खर्च देखील तेवढाच. म्हणजे साधारणतः ३० ते ३५ हजार रुपये एवढा हेक्टरी खर्च दिला असता तर तो शेतकऱ्यांना दिलास म्हणता आला असता.

मुळात नुकसानीचे पंचनामेच झालेले नाही, काही तरी थातूरमातूर आकडेवारी मागवून घेवून घेतलेला हा चुकीचा आणि शेतकऱ्यांची चेष्टा करणारा निर्णय आहे, आणि याचा मी निषेध करतो, असेही निलंगेकर म्हणाले.आम्ही पन्नास हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती, पण ३५ हजारांची जरी मदत केली असती तर शेतकऱ्यांना झालेले नुकसान निस्तारून रब्बीच्या पिकासाठी शेत तयार करून, बी-बियाणांसाठी आधार झाला असता. पण सरकारने केवळ शेतकऱ्यांची थट्टा करत त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे.

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून वीज बील माफी, बॅंकाची वसुली, इतर करवसुली न करण्याचा निर्णय घेतला असता तर ती तातडीची मदत समजली गेली असती. बर त्यासाठी सरकारला पैसाही लागणा नव्हता, पण राज्य सरकारने या बाबतीतही कुठलाच निर्णय घेतला नाही, असा आरोपही निलंगेकर यांनी केला.

Editd By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com