अशोक चव्हाणांच्या मनात मराठा आरक्षणाबद्दल पाप ?

अगोदरही आघाडी सरकार असताना मराठा समाजाच्या प्रश्नावर काम करायचो, गेली ३० वर्षांपासून कोणतेही सरकार असो मी मराठा समाजाच्या प्रश्नावर सातत्याने सरकारला जाब विचारला आहे. आताही तेच काम करत असल्याचे विनायक मेटे म्हणाले.
vinayk mete- ashok chvan contrevercey news
vinayk mete- ashok chvan contrevercey news

बीड : मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण मराठा आंदोलनाला भाजपचे नाव जोडत आहेत, त्यांनी पुरावे द्यावेत. आम्ही मराठा समन्वय समितीकडून त्यांच्या चुका होतात हे स्पष्टपणे सांगत आहोत. मग राग येण्याचे कारण काय? अशोक चव्हाणांच्या मनात मराठा आरक्षणाबद्दल पाप आहे का? असा सवाल करत मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी चव्हाणांवर पलटवार केला. त्यांचे वक्तव्य म्हणजे ‘नाचता येईना अन॒ अंगण वाकडे’ असल्याचा टोलाही मेटे यांनी लगावला.

मराठा आरक्षणाच्या मद्यावरून अशोक चव्हाण व आमदार विनायक मेटे यांच्यात सध्या शीतयुध्द भडकले आहे. चव्हाण यांच्या आरोप व टिकेला आज मेटे यांनी उत्तर दिले. मेटे म्हणाले, उगाच हवेमध्ये गोळ्या मारण्यात काय अर्थ. मंत्री अशोक चव्हाण यांचे न्यायालयात चुकत असल्याचा मराठा आरक्षण समन्वय समितीचा दावा आहे. न्यायालयात व्हीसीद्वारे सुनावणी नको असे आमचे मत पुर्वीपासून होते. प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करावे, एकत्रित सुनावणी घ्यावी, अन वकील नेमण्यातही त्याच चुका केलेल्या आहेत असे आमचे खात्रीशिर सांगणे आहे. 

अशोक चव्हाण यांच्या चुकांमुळेच नोकरभरती थांबली. यात नेमका भाजपचा कट कोणता, षडयंत्र कोणते, भाजपचा पुरस्कृतपणा कोणता हे त्यांनी स्पष्ट करावे. त्यांच्याच मनामध्ये आरक्षणाबद्दल, मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत पाप आहे का, हे स्पष्ट त्यांनी स्पष्ट करावे असे आवाहनी मेटे यांनी केले. आपण अगोदरही  आघाडी सरकार असताना मराठा समाजाच्या प्रश्नावर काम करायचो, गेली ३० वर्षांपासून कोणतेही सरकार असो मी मराठा समाजाच्या प्रश्नावर सातत्याने सरकारला जाब विचारला आहे. आताही तेच काम करत असल्याचे विनायक मेटे म्हणाले.

अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हाही मी राष्ट्रवादीत असताना मराठा समाजाच्या प्रश्नावर संघर्ष केलेला आहे. मग आता कोणता बदल झालाय असा सवाल करतांनाच औरंगाबाद येथे सुरू असलेल्या आंदोलन ठिकाणी सोमवारी पोलिसांनी अचानक मराठा आंदोलकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. हा प्रकार दुर्दैवी असून या घटनेचा निषेध करत असल्याचे मेटे म्हणाले. यामुळे मराठा समाज संतापलेला आहे. या महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यापासून मराठा समाजासाठी काहीही केले नाही.

संपूर्ण मराठवाड्यात या कारवाईने संतापाची लाट आहे. आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने मराठा समाज या राज्य सरकारला कधीही माफ करणार नसून मराठ्यांशी या समाजाची आता गाठ असल्याचा इशाराही विनायक मेटे यांनी दिला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com