महाविकास आघाडीची ताकद पदवीधरच्या निवडणुकीतून दाखवा..

दोन टर्मध्ये विधान परिषदेच्या सभागृहात त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. केवळ पदवीधर, शिक्षकांचेच नाही तर मराठवाड्यातील पाणी प्रश्न, बेरोजगारी असे अनेक मुद्दे पोटतिडकीने मांडले. या काळात त्यांनी केलेले काम आणि पदवीधरांचे सोडवलेले प्रश्न याची पावती मतदार चव्हाण यांना तिसऱ्यांदा दिल्याशिवाय राहणार नाहीत.
Yuva Sena Melawa Aurangabad news
Yuva Sena Melawa Aurangabad news

औरंगाबाद ः  राज्यात भक्कपणे उभी असलेली महाविकास आघाडी आणि या सरकारची ताकद दाखवण्याची संधी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निमित्ताने चालून आली आहे. सतीश चव्हाण यांना बहुमताने विजयी करत, भाजपला महाविकास आघाडीची ताकद दाखवा, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मित्र पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ औरंगाबाद युवसेनेच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तीनही पक्षांचे पदाधिकारी आणि पदवीधर, मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना चंद्रकांत खैरे म्हणाले, सतीश चव्हाण बारा वर्षापासून मराठवाडा पदवीधरचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांना पदवीधरांच्या प्रश्नांची जाण आहे. दोन टर्मध्ये विधान परिषदेच्या सभागृहात त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. केवळ पदवीधर, शिक्षकांचेच नाही तर मराठवाड्यातील पाणी प्रश्न, बेरोजगारी  असे अनेक मुद्दे पोटतिडकीने मांडले.

या काळात त्यांनी केलेले काम आणि पदवीधरांचे सोडवलेले प्रश्न याची पावती मतदार चव्हाण यांना तिसऱ्यांदा दिल्याशिवाय राहणार नाही. एका अर्थाने राज्यातील महाविकास आघाडी किती शक्तीशाली आहे, हे दाखवणारी ही निवडूणक आहे. त्यामुळे युवासेना आणि तीन्ही पक्षाच्या तरुण पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सतीश चव्हाण यांना सर्वाधिक पहिल्या पसंतीची मते मिळून ते विजयी कसे होतील, यासाठी जोर लावावा, असे आवाहन देखील खैरे यांनी केले.

विरोधकांची फक्त हवा...

पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाठ म्हणाले, भाजपने केवळ हवा निर्माण करणारा प्रचार केला आहे. शिवसेनेशी दगाबाजी करून भाजपने अपप्रचार सुरू केला असून भाजपच्या या ढोंगी राजकारणाला प्रतिउत्तर देण्यासाठी पदविधरांचे प्रश्न आग्रही भूमीकेतून सोडविणारे सतीश चव्हाण यानांच विक्रमी मताधिक्याने निवडून द्या.

निवडणूक आली की, जातीचे राजकारण करायचे आणि मते मागायची असे धोरण विरोधीपक्षाचे आहे. भाजपचा उमेदवार आजवर कधी मराठवाड्यात पदवीधर, शिक्षकांचे काम करतांना दिसला नाही. मात्र गेल्या बारा वर्षापासून पदवीधरांना न्याय देण्यासाठी झटणारे सतीश चव्हाण पुन्हा निवडून येणे गरजेचे आहे. युवासेनेने आपली सगळी ताकद त्यांना निवडून आणण्यासाठी लावावी, असे आवाहन युवासनेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ यांनी यावेळी केले.

मित्राच्या पाठीत खंबीर खुपसणाऱ्या भाजपच्या विरोधात माझा हा लढा आहे. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही, आणि आम्ही जाहीपणे बोलू शकत नाही असे, त्यांचे कारनामे आहेत, असा टोला सतीश चव्हाण यांनी आपल्या भाषणातून लगावला.आज  शिवसेना माझ्यासोबत माझ्या विजयात शिवसेना, युवसेनेचा सिंहाचा वाटा राहील, अशी अपेक्षाही चव्हाण यांनी व्यक्त केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com