कोरोना काळात उघड्या तोंडाने फिरणाऱ्यांना शिवसैनिकांनी मास्क घातले..

शिवसेनेने आज चौका चौकात उभे राहून मास्क शिवाय बाहेर पडणारे नागरिक, वाहनधारक, रिक्षाचालक यांना मास्क वाटप केले.केवळ मास्क दिलेच नाही तर ते घालूनही दिले. या शिवाय रिक्षाचालक, फेरीवाले ज्यांचा लोकांशी जास्त संपर्क येतो त्यांना साबण वाटप करत वारंवार हात स्वच्छ धुण्याचे आवाहन देखील शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.
shivsena distribute mask for people news
shivsena distribute mask for people news

औरंगाबाद ः राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृतांचे प्रमाण पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘, ही मोहिम हाती घेतली आहे. औरंगाबाद जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने या मोहिमे अंतर्गत आज शहर आणि ग्रामीण भागातील चौकाचौकात मास्क न घालणाऱ्या नागरिकांना मास्कचे वाटप करत त्यांना त्याचे महत्व पटवून सांगितले. कोरोनाला रोखण्यासाठी १ ते २३ आॅक्टोबर दरम्यान शिवसेनेकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

कोरोनापासून आपल्या कुटुंबाचे व स्वतःचे रक्षण करण्याची जबाबदारी आपलीच आहे, या संकल्पनेतून मुख्यमंत्र्यांनी ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी‘, ही मोहिम संपुर्ण राज्यात सुरू केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात ३५ हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले असून साडेनऊशे पेक्षा जास्त जणांचे बळी या महामारीने घेतले आहेत.

२ आॅक्टोबर पासून वार्ड व गावागावात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी‘, ही मोहिम शिवसैनिकांनी शपथ घेऊन राबवण्यास सुरूवात केली. कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात शहर व जिल्ह्यात कमी असली तरी मास्क वापरण्याचा बाबतीत अजूनही नागरिक हलगर्जीपणा करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे शिवसेनेने आज चौका चौकात उभे राहून मास्क शिवाय बाहेर पडणारे नागरिक, वाहनधारक, रिक्षाचालक यांना मास्क वाटप केले. केवळ मास्क दिलेच नाही तर ते घालूनही दिले. या शिवाय रिक्षाचालक, फेरीवाले ज्यांचा लोकांशी जास्त संपर्क येतो त्यांना साबण वाटप करत वारंवार हात स्वच्छ धुण्याचे आवाहन देखील शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.

वाघ्या-मुरळी करणार जनजागृती..

कोरोना संसर्गापासून स्वतः आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्ह्यात शिवसेनेकडून जनजागृती मोहिमही राबवण्यात येणार आहे. वाघ्या-मुरळी दररोज ग्रामीण भागात चार गावांमध्ये फिरून जनजागृती करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com