मेडीकल प्रवेशाच्या जाचक अटी विरोधात खासदाराचे स्वातंत्र्यदिनीच आंदोलन

७०:३० टक्के सूत्रामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना 'NEET' मध्ये पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत जवळपास ४०-५० गुण अधिक घ्यावे लागतात. ही बाब समानतेच्या तत्त्वाचा भंग करणारी आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर घोर अन्याय करणारी आहे.
Parbhani mp sanjay jadhav news
Parbhani mp sanjay jadhav news

परभणी ः वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ७०:३० टक्के हे सूत्र देशातील इतर कुठल्याही राज्यात राबविले जात नसून या सूत्रामुळे दरवर्षी मराठवाड्यातील किमान ५०० विद्यार्थी डॉक्टर बनण्यापासून वंचित राहात आहेत. ही बाब शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या मराठवाडा विभागाच्या दृष्टीने हानीकारक आणि त्याहीपेक्षा अन्यायकारक आहे. हा फार्मुला रद्द करावा या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यासमोर सर्वपक्षीय निदर्शने करणार असल्याचे परभणीचे शिवसेना खसादार संजय जाधव यांनी सांगतिले.

'राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी (NEET)' मध्ये पात्र झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात विभागनिहाय ७०:३० टक्के वाटा हे सूत्र राबविले जात आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा असे तीन विभाग करून महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एकूण जागांपैकी ऑल इंडियाचा १५ टक्के वाटा वजा करून उर्वरित जागांसाठी ७० टक्के वाटा विभागाचा आणि ३० टक्के वाटा राज्याचा या सूत्रानुसार ही प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यात येते.

विशेष म्हणजे वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही सामाजिक तथा जातीनिहाय आरक्षणानुसार राबविली जात असताना पुन्हा विभागनिहाय आरक्षण कशासाठी? असा सवाल उपस्थित करत खासदार संजय जाधव म्हणाले,  ७०:३० टक्के सूत्रामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना 'NEET' मध्ये पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत जवळपास ४०-५०  गुण अधिक घ्यावे लागतात. ही बाब समानतेच्या तत्त्वाचा भंग करणारी आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर घोर अन्याय करणारी आहे.

त्यामुळे ७०:३० टक्के हे सूत्र त्वरित रद्द करून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी मी यापुर्वी देखील केली आहे. ७०:३० हा फॉर्मुला त्वरीत रद्द न केल्यास येत्या १५ ऑगस्ट  स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे पालकमत्र्यांसमोर निदर्शने करून मराठवाड्यातील जनतेच्या वतीने सर्व पक्षीय मोठे जन आंदोलन उभारण्यात येणार आहे.

वास्तविक पाहता मराठवाडा विभागाच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागांत वैद्यकीय महाविद्यालये व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या किती तरी पटीने जास्त आहे. प्रचलित सूत्रामुळे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मराठवाड्यातील शेकडो विद्यार्थ्यांवर कित्येक वर्षांपासून अन्याय होत आहे, हा अन्याय दूर झाला पाहिजे, यासाठी हे जनआंदोलन असल्याचेसंजय जाधव यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com