पिकांच्या पंचनाम्यासाठी शिवसेना आमदाराचे महसुल मंत्र्यांना साकडे

राज्यात व जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्ण आणि मृतांचे वाढते प्रमाण यामुळे संपुर्ण प्रशासन सध्या या कामी लागले आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेले शेती व पिकांचे नुकसान व त्याच्या पंचनाम्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. सत्तेत असूनही आमदारांना आपापल्या मतदारसंघातील नुकसानीच्या पंचनाम्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो आहे.
mla bornare letter to revineuw minister news
mla bornare letter to revineuw minister news

औरंगाबाद ः जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागांवर देखील विविध रोग पडल्याने ते ही धोक्यात आले आहे. परंतु अजूनही पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जात नाहीत. वैजापूर मतदारसंघातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा असे साकडे घालत शिवसेना आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी थेट महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाच प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

जून महिन्यात पावसाला दमदार सुरूवात झाल्यामुळे मतदारसंघात शेतकऱ्यांनी विक्रमी पेरण्या केल्या. परंतु त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने बहुतांश पिके वाया गेली. फळबागांसह खरीपाच्या सोयाबीन, मका, कांदा, बाजरी आणि कपाशीचे अतोनात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे जमीनी उपळून गेल्याची परिस्थिती संपुर्ण मतदारसंघात आहे. या शिवाय मृगात बहरलेल्या डाळीबांच्या बागाही मोठ्या प्रमाणावर उध्दवस्त झाल्या, त्यावर तेल्या, टिपका, बसका या रोगांचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे ही फळही हातची गेली आहेत.

यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान तर झालेच, शिवाय शेत जमीनीची हानी देखील झाली आहे. अशा परिस्थित शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने होणे गरजेचे आहे. ते तात्काळ करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळायला हवी असेही आमदार बोरनारे यांनी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांना सांगितले. यावर लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करू, असे आश्वासन थोरांतांनी त्यांना दिले.

राज्यात व जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्ण आणि मृतांचे वाढते प्रमाण यामुळे संपुर्ण प्रशासन सध्या या कामी लागले आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेले शेती व पिकांचे नुकसान व त्याच्या पंचनाम्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. सत्तेत असूनही आमदारांना आपापल्या मतदारसंघातील नुकसानीच्या पंचनाम्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात देखील हा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला होता. महसुल मंत्र्यांच्या आश्वासनानंतर तरी पिकांचे पंचनामे होतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com