शिवसेना नेते खैरे बिहारकडे रवाना, तीन दिवस पाच मतदारसंघात करणार प्रचार.. - Shiv Sena leader Khaire leaves for Bihar, will campaign in five constituencies for three days | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना नेते खैरे बिहारकडे रवाना, तीन दिवस पाच मतदारसंघात करणार प्रचार..

जगदीश पानसरे
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यापुर्वी देखील बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभाग नोंदवला होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यावर पक्षाने स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिली. आज औरंगाबाद येथून चंद्रकांत खैरे निवडक शिवसैनिकांना सोबत घेऊन बिहारकडे रवाना झाले आहेत. २ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ते पाच विधानसभा मतदारसंघात प्रचार करणार आहेत.

औरंगाबाद ः शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची बिहार राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली होती. परंतु पहिल्या टप्यातील मतदान पार पडले तरी राज्यातील ज्या नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून निवड झाली होती, ते नेते आपापल्या भागातच दिसत होते. त्यामुळे हे स्टार प्रचारक बिहारला कधी जाणार, अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर त्यांना बिहारकडे कूच करण्याचे आदेश आले, त्यानूसार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे आज दुपारी बिहारला निघाले. तीन दिवसांच्या या दौऱ्यात ते पाच विधानसभा मतदारसंघात प्रचार करणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहार राज्यात विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला. बिहारमधील राजकीय वातावरण, केंद्रीतील एनडीए सरकारमधून भाजपचे मित्रपक्ष एक एक करून बाहेर पडत असतांना शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार देणाऱ्या शिवसेनेने यावेळी सुरूवातीला ५० जागा लढणार असल्याची घोषणा केली होती. परंतु नंतर पक्षाने केवळ २३ मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रचाराला सुरूवात केल्यानंतर आता त्यांच्या मदतीला राज्यातून स्टार प्रचारक पोहचत आहेत.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यापुर्वी देखील बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभाग नोंदवला होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यावर पक्षाने स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिली. आज औरंगाबाद येथून चंद्रकांत खैरे निवडक शिवसैनिकांना सोबत घेऊन बिहारकडे रवाना झाले आहेत. २ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ते पाच विधानसभा मतदारसंघात प्रचार करणार आहेत.

या संदर्भात `सरकारनामा`शी बोलतांना खैरे म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आज मी बिहारकडे निघालो आहे. दिल्ली विमानतळावरून सायंकळी पाच वाजता आम्ही पटण्याकडे जाणार आहोत. स्टार प्रचारक म्हणून माझ्यावर समीस्तापूर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेनेचे बंडु ओक, आनंद तांदुळवाडीकर, गणु पांडे, अॅड. आशुतोष डंख, सतीश कटकटे या शिवसैनिकांना सोबत घेऊन आम्ही या मतदारसंघामध्ये प्रचार करणार आहोत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख