शरद पवार आदरणीयच; काल, आज आणि उद्याही...

शरद पवार यांचा राजकारणाचा ६० वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे आणि आमच्या घराण्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दोघांच्याही कामाची आयडॉलॉजी सारखी असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
Chatrapati Sambhaji raje press conference news
Chatrapati Sambhaji raje press conference news

बीड : शरद पवार आदरणीयच आहेत. काल, आज आणि उद्याही त्यांच्याबद्दल आपले हेच मत असेल. त्यांच्याबद्दलच्या कुठल्याही प्रश्नाला आपण उत्तर देणार नाही. अगदी त्यांनी आपल्याबद्दल दहा उत्तरे दिली तरी, अशा शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांशीही त्यांनी संवाद साधला. तत्पुर्वी पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. तामिळनाडूसह काही राज्यांत ५२ टक्क्यांहून अधिक आरक्षण आहे. मात्र, पुर्वी व आता शरद पवार यांनी या विषयात म्हणावे तेवढे लक्ष घातले नाही, म्हणून मराठा आरक्षणाचा हा पेच निर्माण झाला आहे का? असा प्र्श्न विचारला गेला, तेव्हा संभाजीराजे यांनी वरील मत व्यक्त केले.

संभाजीराजे म्हणाले, शरद पवारांचा अनुभव मोठा आहे. मात्र, १९६७ नंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर प्रथम आपण मैदानात उतरलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जाती आणि १२ बलुतेदारांना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाचा बहुजनांत समावेश करुन आरक्षण दिले.

आपण केवळ मराठा समाजाच्याच आरक्षणासाठी नाही तर धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मताचे आहोत. मुस्लिम समाजाने आवाहन केले तर त्यांच्या आरक्षण लढ्यातही आपण सहभागी होऊ. १९६७ पर्यंत संसदेत मराठा समाज आरक्षणात होता. नंतर बदल होऊन काही जातींना वगळले व नंतर घेतले. समाजातील १० - १५ टक्के लोक सक्षम असले तरी समाज आर्थिक मागास असल्यावर मागासवर्गीय आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण नसेल तर इतर समाजाचे आरक्षण काढावे ही मागणी चुकीची असून सर्वांनाच आरक्षणाची गरज आहे म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांनी सर्वांना आरक्षण दिले होते. त्याचा उद्देश सफल होण्याची गरज असल्याचे नमूद करुन समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी लढत असल्याचेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

अतिवृष्टीच्या दुष्काळ दौऱ्यात काही नेत्यांबद्दल नुकसानग्रस्त शेतकरी राग व्यक्त करत असले तरी आपल्याला आपुलकीने जवळ येऊन व्यथा मांडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेमामुळेच हे अनुभवत असल्याचेही संभाजीराजे म्हणाले. आपण पदासाठी नाही तर लोकांची भावना जाणून घेण्यासाठी व सेवेसाठी फिरत असल्याचे त्यांनी सांगितले. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com