Sanjay Raut; हिंमत असेल तर संजय राऊत यांनी नाशिकमध्ये निवडणूक लढवावी!

शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेना नेत्यांनाच आव्हान दिले.
Hemant Godse & Sanjay Raut
Hemant Godse & Sanjay RautSarkarnama

नाशिक : बंडखोरी (Rebel) करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekneth Shinde) गटात गेलेले खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) पुन्हा निवडून येणार नाही, हे विधान गोडसे यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. आज त्यांनी खासदार राऊत (Sanjay Raut) यांनी हिंमत असेल तर नाशिकमध्ये (Nashik) निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान दिले. (Shinde group`s rebel MP Hemant Godse given challange to Sanjay Raut)

Hemant Godse & Sanjay Raut
Dada Bhuse; पालकमंत्री दादा भुसेंवर गुन्हा दाखल करा!

दोन दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी नाशिकमध्ये शिवसेना भक्कम आहे. शिंदे गटात गेलेले गद्दार हेमंत गोडसे पुन्हा निवडून येणार नाही. त्यांनी आपल्या अनामत रक्कमेची काळजी करावी, असा दावा केला होता. त्यामुळे हेमंत गोडसे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

Hemant Godse & Sanjay Raut
Uddhav Thackrey: लांबलेल्या महापालिका निवडणुकीचा ठाकरे गटाला धोका

आज याबाबत गोडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझ्याबाबत हेमंत गोडसे हा चेहरा होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याबाबत चेहरा महत्वाचा नसतो, तर काम महत्वाचं असतं. शिवाय संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन निवडणूक लढवून दाखवावी. त्यामुळे त्यांना त्याचे उत्तर मिळेल. मी खुप विकासाची कामे केली आहेत, याची सगळ्यांना जाणीव आहे. या कामाच्या जोरावरच मी पुन्हा निवडून येईन. मात्र राऊत यांनी नाशिकमध्ये निवडणूक लढवून दाखवावी.

शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या खासदार गोडसे यांचा राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. गोडसे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी स्वतःची कबर खोदली आहे. आता त्यांनी निवडणुकीत निवडून येऊन दाखवावं असं थेट चॅलेंज दिले होते.

गोडसे म्हणाले, हिम्मत असेल तर माझ्या समोर येऊन निवडणूक लढा' असे आव्हान गोडसे यांनी दिल्याने या राजकीय वादाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com