धार्मिकस्थळे, हाॅटेल सुरू करा, लोकप्रतिनिधींची मागणी

हजारो लोकांचा उदर्निवाह धार्मिकस्थळाजवळ थाटण्यात येणाऱ्या दुकान व व्यवसांयवर अंवलबून असतो. लाॅकडाऊन आणि कोरोनामुळे चार महिन्यांपासून या सर्वांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. याचा आता कुठेतरी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. राज्य शासनाने नियम व अटींसह आता ती सुरू केली पाहिजे, जेेणे करून हे छोटे-मोठे दुकानदार आपले दैनंदिन व्यवहार सुरू करू शकतील.
aurangabad public reprecentative and administration meeting news
aurangabad public reprecentative and administration meeting news

औरंगाबाद ः  गेल्या चार महिन्यांपासून कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे राज्यासह शहर व जिल्ह्यातील हाॅटेल्स, सर्व धर्मीयांची धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता नियम व अटींच्या आधीन राहून हे सर्व सुरू करावे, अशी मागणी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे करणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.

दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत अनेक मुद्यावर चर्चा झाली. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणारी आर्थिक उलाढाल, या उत्सवाचे महत्व लक्षात घेता मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांना परवानगी देऊन गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले. या शिवाय मंदिर, मशीद, चर्च, गुरद्वारासह सर्वच धार्मिक स्थळे आता खुली करावीत यावर देखील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे एकमत झाले.

हजारो लोकांचा उदर्निवाह धार्मिकस्थळाजवळ थाटण्यात येणाऱ्या दुकान व व्यवसांयवर अंवलबून असतो. लाॅकडाऊन आणि कोरोनामुळे चार महिन्यांपासून या सर्वांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. याचा आता कुठेतरी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. राज्य शासनाने नियम व अटींसह आता ती सुरू केली पाहिजे, जेेणे करून हे छोटे-मोठे दुकानदार आपले दैनंदिन व्यवहार सुरू करू शकतील.

धार्मिक स्थळांसोबतच हाॅटेल व्यवसाय हा मोठा महत्वाचा भाग आहे. यामुळे केवळ तिथे येणाऱ्या ग्राहकांना जेवण मिळते एवढ्याशीच हा व्यवसाय निगडीत नाही, तर तिथे काम करणारे कुक, वेटर व इतरांच्या पोटापाण्याचा प्रश्न देखील या व्यवसायावर अवंलबून आहे. चार महिने या लोकांचे खूप हाल झाले आहेत. आता त्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.परंतु यावर राज्य सरकार केंद्र शासनाच्या नियम अटींचा हवाला देत आहे.

दिल्ली किंवा मुंबईत बसलेला व्यक्ती किंवा अधिकारी औरंगाबादेतील परिस्थिती ठरवू शकत नाही. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे राज्य सरकारला निवेदन पाठवून धार्मिक स्थळे व हाॅटेल तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. राज्यातील बससेवा पुर्ववत सुरू करण्या संदर्भात देखील आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com