Marahtwada padvidhar matadar sangh news aurangabad
Marahtwada padvidhar matadar sangh news aurangabad

पंकजा मुंडे समर्थक रमेश पोकळेंची बंडखोरी, उमेदवारी कायम ठेवली..

शिरीष बोराळकर यांची भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंड यांचे कट्टर समर्थक असलेल्या रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मुर्ती हातात घेत त्यांनी उमेदवारी दाखल केल्याने त्यांच्या या बंडाची चर्चा राज्यभरात सूरू झाली होती. परंतु रमेश पोकळे हा भाजपचा सच्चा कार्यकर्ता आहे, समजूतदार आहे, त्याची समजुत काढण्यात मला यश येईल, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी औरंगाबद येथे बोराळकरांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्धाटन प्रसंगी व्यक्त केला होता.

औरंगाबाद: औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ३५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. बीड भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व पकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमेश पोकळे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली आहे. 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ४५ पैकी दहा जणांनी आपले अर्ज मागे घतले. यामध्ये अक्षय खेडकर, औरंगाबाद , ईश्वर मुंडे, बीड ,अंभोरे शंकर, औरंगाबाद,  जयसिंगराव गायकवाड पाटील, औरंगाबाद, प्रविणकुमार पोटभरे, बीड, विजेंद्र सुरासे, जालना, विवेकानंद उजळंबकर, लातूर, शेख गुलाम रसुल, औरंगाबाद, संजय गंभीरे ,बीड आणि संदिप कराळे, नांदेड यांचा समावेश आहे.

शिरीष बोराळकर यांची भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंड यांचे कट्टर समर्थक असलेल्या रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मुर्ती हातात घेत त्यांनी उमेदवारी दाखल केल्याने त्यांच्या या बंडाची चर्चा राज्यभरात सूरू झाली होती. परंतु रमेश पोकळे हा भाजपचा सच्चा कार्यकर्ता आहे, समजूतदार आहे, त्याची समजुत काढण्यात मला यश येईल, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी औरंगाबद येथे बोराळकरांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्धाटन प्रसंगी व्यक्त केला होता.

पकंजा मुंडे यांचे दुसरे समर्थक प्रवीण घुगे यांनी समजूत काढून त्यांना माघार घ्यायला लावण्यात पकंजा मुंडे, रावसाहेब दानवे यांना यश आले होते. परंतु आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पोकळे यांनी माघार न घेता बंडाच निशाण कायम ठेवले आहे. आता पोकळे यांची कुणी समजुत घालण्याचा प्रयत्न केला, की मग त्यांना अर्ज कायम ठेवा, सल्ला देण्यात आला हे मात्र समजू शकलेले नाही. जयसिंगराव गायकवाड यांच्या राजीनाम्यामुळे अधिच अडचणीत सापडलेल्या भाजपच्या उमेदवाराची अडचण पोकळे यांनी बंडखोरी केल्याने आणखीणच वाढली आहे.

हे उमेदवार रिंगणात...

बोराळकर शिरीष (भाजप), औरंगाबाद,  सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस) औरंगाबाद, अब्दुल रऊफ ( समाजवादी पार्टी) औरंगाबाद, अंकुशराव  पाटील ( राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर, कुणाल खरात,  (AIMIM) औरंगाबाद, ढवळे सचिन राजाराम ( प्रहार जनशक्ती पक्ष), औरंगाबाद, प्रा.नागोराव  पांचाळ ( वंचित बहुजन आघाडी) परभणी, डॉ.रोहित बोरकर ( आम आदमी पार्टी) पुणे,  शे.सलीम शे.इब्राहिम (वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी,  सचिन निकम (रिपब्लिकन सेना) औरंगाबाद,  अशोक सोनवणे ( अपक्ष ) औरंगाबाद,  ॲड./प्रा. अश्विनकुमार क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ' के.सागर ' ( अपक्ष ) नांदेड, आशिष देशमुख (अपक्ष) बीड, उत्तम  बनसोडे (अपक्ष) नांदेड, काजी तसलीम निजामोद्दीन (अपक्ष) उस्मानाबाद, कृष्णा  डोईफोडे (अपक्ष), औरंगाबाद.ॲड.गणेश करांडे (अपक्ष) बीड, घाडगे राणी रवींद्र (अपक्ष) बीड, दिलीप घुगे ( अपक्ष), हिंगोली,  पोकळे रमेश ( अपक्ष) बीड, भारत  फुलारे (अपक्ष) औरंगाबाद, ॲड. (डॉ.) यशवंत कसबे (अपक्ष) परभणी, रमेश कदम (अपक्ष) नांदेड, राम आत्राम (अपक्ष) लातूर, वसंत भालेराव (अपक्ष) औरंगाबाद,विलास  तांगडे (अपक्ष) जालना, डॉ.विलास  जगदाळे (अपक्ष) औरंगाबाद,  विशाल नांदरकर (अपक्ष) औरंगाबाद, ॲड.शरद कांबळे (अपक्ष) बीड, ॲड.शहादेव भंडारे (अपक्ष) बीड,  ॲड.शिरिष कांबळे (अपक्ष) बीड, शेख हाज्जू हुसेन पटेल (अपक्ष) औरंगाबाद , समदानी शेख (अपक्ष) नांदेड, सिध्देश्वर मुंडे (अपक्ष) बीड, आणि संजय तायडे ( अपक्ष) औरंगाबाद हे निवडणूक मैदानात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com