पोलीस दलातील रॉकीच्या मृत्यूने पंतप्रधानही भावूक झाले 

१८ ऑक्टोबर २०११ ला जन्म झालेला रॉकी वयाच्या सहाव्या महिन्यात बीड पोलिस दलात दाखल झाला. नऊ महिने त्याने विविध प्रशिक्षणे घेतल्यानंतर त्याची गुन्हे तपासासाठी निवड झाली. नितीन येवले व सुरेंद्र दुबाले यांच्या सोबतीने त्याने २०१३ ते १५ या तीन वर्षांत राष्ट्रीय पातळीवरील एआयपीडीएम स्पर्धांत महाराष्ट्र पोलिसांचे प्रतिनिधित्व केले.
Pm Modi got emotional rockeys death news
Pm Modi got emotional rockeys death news

बीड : म्हणतात ना चांगल्या कामाचे नाव मरणानंतरही निघते. माणूसच काय पण अनेक प्राण्यांच्या कामगिरीची नोंद देखील इतिहासात झालेली आहे. बीडच्या पोलिस दलातील रॉकी या श्वानानेही असे काम केले, की त्याच्या मृत्यूमुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा भावूक झाले. यानिमित्ताने बीड पोलिस दलाची नोंदही पंतप्रधानांच्या यादीत झाली. रविवारच्या ‘मन की बात’मध्ये पोलिस श्वान रॉकीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि बीड पोलिसांनी त्याला दिलेल्या अंतिम निरोपाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. २७ सेकंदांचा वेळ त्यांनी यासाठी देणे हा रॉकीच्या कामगिरीचा सन्मान आणि बीड पोलिसांसाठी अभिमानास्पद आहे.

आपले काम निष्ठेने आणि प्रामाणिक केले तर त्याची नोंद घेतलीच जाते. मनुष्यबरोबरच अनेक प्राण्यांचीही इतिहासाने नोंद घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची कृष्णा घोडी असेल वा छत्रपती संभाजी महाराज यांचा ऐरावत घोडा, महाराणा प्रताप यांचा चेतक घोड्याचे नाव आजही घेतले जाते. असेच नाव बीड पोलिस दलातील रॉकीने कमावले.

अनेक पदकांचा मानकरी आणि खून, चोऱ्या, दरोडे अशा साडेतीनशेवर गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात रॉकीची महत्वाची भूमिका होती. पण आजाराने निधन झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला बड्या पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला खांदा देत अखेरचा निरोप दिला. यावेळी भावूक झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या डोळ्यांच्या कडाही पानावल्या. रॉकीची कामगिरी आणि बीड पोलीस दलाने त्याला दिलेल्या अखेरच्या निरोपाची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात' मधून घेत

नऊ वर्षांचे आयुष्य जगलेल्याला रॉकीला निरोप देताना हवेत बंदुकीच्या फैरी झाडून पोलिस दलातर्फे मानवंदनाही देण्यात आली. त्याचे जाणे पोलिस दलासाठी जेवढ वेदनादायी तेवढे त्याच्यासाठी अभिमानाचे ठरले. त्याच्या अंत्यविधीला सगळ्या पोलिस दलातील प्रमुख हजर होते. सजविलेल्या पोलिस जीपमधून रॉकीची अंत्ययात्रा निघाली. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपाधीक्षक भास्कर सावंत, स्वप्नील राठोड आदी बड्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मृतदेहाला दोरीच्या सहाय्याने खांदा दिला. त्यानंतर त्याला बंदुकीतून फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. 

सहाव्या महिन्यात पोलिस दलात

१८ ऑक्टोबर २०११ ला जन्म झालेला रॉकी वयाच्या सहाव्या महिन्यात बीड पोलिस दलात दाखल झाला. नऊ महिने त्याने विविध प्रशिक्षणे घेतल्यानंतर त्याची गुन्हे तपासासाठी निवड झाली. नितीन येवले व सुरेंद्र दुबाले यांच्या सोबतीने त्याने २०१३ ते १५ या तीन वर्षांत राष्ट्रीय पातळीवरील एआयपीडीएम स्पर्धांत महाराष्ट्र पोलिसांचे प्रतिनिधित्व केले.

२०१६ मध्ये म्हैसूर (कर्नाटक) येथील याच स्पर्धेत त्याने कांस्य पदक पटकावत पोलिस दलाची मान उंचावली. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतील ३६५ गुन्ह्यांचा तपास आणि शिरटोन (जि. उस्मानाबाद) येथील खुनाच्या तपासातही त्याच्यामुळे यश आले. कोरोना जनजागृती बाबत पोलिस दलाने बनविलेल्या शॉर्ट फिल्ममध्येही रॉकीची भूमिका आहे. दरम्यान, १७ जूलैपासून आजारी असलेल्या रॉकीचे शनिवारी पहाटे निधन झाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com