दरेकरांच्या वाहनांचा ताफा माघारी, अन बैलगाडीतून मेटेंसह झाली शिवार वारी

विनायक मेटेंनी दरेकरांना फोन लावला आणि आपण सोबत पाहणी करण्याचे नियोजन झाल्याची आठवण दिली. मग, दरेकरांनीही वाहनांचा पुढे गेलेला ताफा मागे वळविला आणि विश्रामगृह गाठले. नंतर दोघे सोबतीने तळेगावला पोचले. शेतावर जाण्यासाठी दोघांनी बैलगाडीतून प्रवास केला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी पाहणीतून काढता पाय घेतला.
Mla mete-darekar news beed
Mla mete-darekar news beed

बीड : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात स्थानिक भाजप व शिवसंग्रामधील राजकीय कुरघोड्यांचा प्रत्यय समोर आला. भाजपने पुढे दामटलेला दरेकरांचा ताफा मेटेंनी माघारी बोलविला आणि मग दोघांनी एकत्र बैलगाडीतून शिवार फेरी केली. विशेष म्हणजे कल जाऊ नये म्हणून दरेकरांनी मेटेंच्या खांद्यावर हात ठेवून आधार घेतला होता.

अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, मका, संत्र्यांच्या बागांचे मोठे नुकसान झाले. सरकारला नुकसान पहालया वेळ नाही. सरकारला जागे करण्यासाठी बांधावर आलो आहोत. ओला दुष्काळ जाहीर करुन बागायती शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तर कोरडवाहूसाठी २५ हजारांची मदत द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

सोमवारी दरेकर यांनी माजलगाव तालुक्यातील गंगामसला, घळाटवाडी तसेच वडवणी येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सोबत भाजप नेते रमेशराव आडसकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के होते. त्यानंतर तळेगाव येथे त्यांच्यासोबत पाहणीसाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे होते. पाहणीनंतर दरेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासह संबंधीत विभागांच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.

दरेकर म्हणाले, अद्याप पंचनामेच नाहीत तर सरकार मदत कधी करणार आहे. शेतकऱ्यांनी विमा भरला असला तरी क्लेम सेटल झालेले नाहीत. शासनाने केलेल्या पंचनाम्यांच्या आधारेच विमा भरपाई देण्याची मागणीही  दरेकर यांनी केली. जिल्ह्यात येवढे नुकसान झालेले असताना पालकमंत्री व कृषीमंत्री अद्याप फिरकलेही नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

मेटेंचा फोन येताच दरेकर विश्रामगृहावर..

माजलगाव व वडवणी तालुक्यातील पाहणीनंतर बीड तालुक्यातील नुकसान पाहणी दरेकर व मेटे करणार असे नियोजित होते. मात्र, बीडमध्ये भाजप व शिवसंग्रामधून विस्तव आडवा जात नाही. माजलगाव व वडवणीतील पाहणीत दरेकरांसोबत भाजप पदाधिकारी होते. बीडला दरेकर येणार म्हणून मेटे विश्रामगृहावर थांबून होते. मात्र, दरेकर बीडला येताच भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा तसाच पुढे दामटला.

याची कुणकुण लागताच विनायक मेटेंनी दरेकरांना फोन लावला आणि आपण सोबत पाहणी करण्याचे नियोजन झाल्याची आठवण दिली. मग, दरेकरांनीही वाहनांचा पुढे गेलेला ताफा मागे वळविला आणि विश्रामगृह गाठले. नंतर दोघे सोबतीने तळेगावला पोचले. शेतावर जाण्यासाठी दोघांनी बैलगाडीतून प्रवास केला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी पाहणीतून काढता पाय घेतला. कच्च्या रस्त्यावरील बैलगाडीच्या प्रवासात कल जाऊ नये म्हणून दरेकरांनी मेटेंचा खांदा पकडून आधार घेतला हे विशेष.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com