गंगा नदीत तरंगणारे मृतदेह लोक विसरलेले नाहीत, निवडणूकीत तोंड कसे दाखवणार?

(In seventy years) सत्तर वर्षात मुस्लीमांनी कधी कुणाचे बळजबरीने(Muslims Not forcibly converting.) धर्मांतर केल्याचे एकही उदाहरण नाही.
Yogi Adityanath And Imitaz Jalil
Yogi Adityanath And Imitaz JalilSarkarnama

औरंगाबाद ः उत्तर प्रदेशात मौलाना कलीम सिद्दीकी यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर बळजबरीने धर्मपरिवर्तन करत असल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर दिल्लीत एमआयएमचे सर्वेसर्वा असुद्दीन ओवेसी यांच्या घरावर देखील हल्ला करण्यात आला. हे एक राजकीय षडयंत्र असून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुसलमांनाना टार्गेट करण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला.

एमआयएमच्या वतीने या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. निवडणूकीत लोकांकडे मत मागायला जाण्यासाठी तोंड नसल्यामुळेच भाजपकडून घाणेरडे राजकारण केले जात असल्याचेही इम्तियाज जलील म्हणाले. खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील निवासस्थानवर हिंदू सेनेच्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांनी हल्ला चढवून नासधूस केली होती.

तर उत्तर प्रदेश सरकारने मुस्लिमांचे धर्मगुरू मौलाना कमाल सिद्दीकी यांना जबरदस्तीने धर्मांतरण करण्याच्या आरोपाखाली अटक केली. या विरोधात एमआयएमने आज रस्त्तावर उतरून आक्रमक आंदोलन केले. यावेळी इम्तियाज जलील यांनी केंद्र व उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर सडकून टीका केली.

इम्तियाज जलील म्हणाले, स्वातंत्र्यापासूनच्या सत्तर वर्षात मुस्लीमांनी कधी कुणाचे बळजबरीने धर्मांतर केल्याचे एकही उदाहरण नाही. पण केवळ निवडणूकीत लोकांकडे मते मागायला जातांना कुठलेच विकासाचे मुद्दे नाही, म्हणून मग मुसलमानांना लक्ष्य करायचे एवढाच त्यांचा उद्देश आहे. वर्षानुवर्ष या देशात होत आले आहे, उत्तर प्रदेशातही तेच होत आहे.

उत्तर प्रदेशातील गंगा नदीत आमच्या हजारो हिंदू माता, भगिनी आणि बांधवांचे तरंगणारे मृतदेह अजूनही लोक विसरलेले नाहीत. संपुर्ण जगाने हे चित्र पाहिले होते. त्यामुळे निवडणूकीत कोणत्या तोंडाने लोकांना मते मागयची हा प्रश्न भाजपचे नेते आणि उत्तर प्रदेश सरकारला पडला आहे. तोंड दाखवायला जागा नसल्यानेच भाजपकडून असे घाण राजकारण केले जात आहे.

Yogi Adityanath And Imitaz Jalil
राज्यपाल अन् मुख्यमंत्री वादात फडणवीसांची उडी

दिल्लीतील सगळ्यात सुरक्षित अशा भागात असलेल्या ओवेसी यांच्या बंगल्यावर हल्ला, तेथील राजू नावाच्या हिंदू बांधवाला झालेली मारहाण हे कुणाच्या पाठिंब्याशिवाय निश्चितच होऊ शकत नाही. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीपैकी केवळ एकाला पोलीस कोठडी आणि इतरांना न्यायालयीन कोठडी दिली जाते, यावरून पोलीस आणि कायदा कुणासाठी काम करतोय हे स्पष्ट होते.

धर्मगुरूंनी सांगितले तर रस्त्यावर उतरू..

पोलिस आणि कायदा आमच्या धर्मगुरूंना जर अशी वागणूक देवून त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. देशात मुस्लिमांच्या बाबतीत असे प्रकार घडत आहेत. औरंगाबादेत मी जेव्हा व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी गेलो होतो, तेव्हा माझ्यावर देखील गुन्हा दाखल करून गंभीर प्रकारचे नऊ गुन्हे दाखल केले होते.

आम्हाला घाबरवून गप्प बसायला भाग पाडण्यासाठी हे सगळे सुरू आहे. पण आम्ही गप्प बसणार नाही, आम्हाला जेवंढ दाबण्याचा प्रयत्न कराल, तेवढ्या दुप्पट ताकदीने आम्ही तुमच्या विरोधात बोलू, असा इशारा देखील इम्तियाज जलील यांनी दिला. मुस्लिम धर्मगुरूंचे आमच्या मनात सर्वोच्च स्थान आहे, जर तेच सुरक्षित नसतील तर त्यांनी फक्त आदेश द्यावा, केवळ औरंगाबादच नाही तर जिल्ह्यातील प्रत्येक मुस्लिम तरूण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असेही इम्तियाज यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in