पाठीवरून हात फिरवत निलंगेकरांनी विधानसभेचे कामकाज शिकवले

विदर्भातील गोसीखुर्द धरण संपूर्ण विदर्भाची तहान भागवत आहे. गडचिरोली, भंडारा यासह अनेक जिल्ह्यांना सिंचन व शेतीसाठी या धरणाचा फायदा झाला असून महाराष्ट्राला हरितक्रांतीच्या दिशेने नेण्याचे महत्वाचे कार्य निलंगेकरांच्या हातून घडले. ज्या विभागांमध्ये मंत्री म्हणून त्यांनी काम केले, त्या खात्यावर त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला.
congress leader thorat vist nilangekars house at latur news
congress leader thorat vist nilangekars house at latur news

निलंगा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन झाल्याची बातमी ऐकताच आम्हाला धक्का बसला. निलंगेकर राज्याचे मुख्यमंत्री असताना मी पहिल्यांदाच निवडून गेलो होतो. विधानसभेच्या कामकाजाचा फारसा अनुभव नव्हता, तेव्हा एखाद्याला पाठीवरून हात फिरवून समजवून  सांगण्याची जी पद्धत असते अगदी त्याच पद्धतीने त्यांनी अम्हा नवख्या आमदाराना विधानसभेचे कामकाज शिकवले, अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निलंगेकरांबद्दलच्या आठवणी जागवल्या. ते अशोक बंगल्यावर निलंगेकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. 

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर या देखील यावेळी उपस्थित होत्या. निलंगेकर कुटुंबाचे सात्वंन करतांना बाळासाहेब थोरात यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. थोरात म्हणाले, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे महाराष्ट्राचे आदरणीय व्यक्तिमत्त्व होते, त्यांनी खूप मोठा कालखंड राजकीय, सामाजिक जीवनामध्ये घालवला. राज्याच्या विकासामध्ये देखील त्यांचा मोठा वाटा होता. पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रभर मोठी धरणे उभारली.

विदर्भातील गोसीखुर्द धरण संपूर्ण विदर्भाची तहान भागवत आहे. गडचिरोली, भंडारा यासह अनेक जिल्ह्यांना सिंचन व शेतीसाठी या धरणाचा फायदा झाला असून महाराष्ट्राला हरितक्रांतीच्या दिशेने नेण्याचे महत्वाचे कार्य निलंगेकरांच्या हातून घडले. ज्या विभागांमध्ये मंत्री म्हणून त्यांनी काम केले, त्या खात्यावर त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला.

काम करण्याची सचोटी, नियोजन, पाठपुरावा, पारदर्शकपणा हे त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे वैशिष्ट होते. मला त्यांच्या कुटुंबातील सदस्या प्रमाणे सहवास लाभला. आदरणीय व्यक्तिमत्त्व, जुन्या पिढीतील महत्त्वाचा माणूस गेल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणाची मोठी हानी झाली आहे. वसंतदादा पाटील यांच्या नंतर मुख्यमंत्रीपदाची धुरा निलंगेकरांकडे आली, त्यामुळे त्यांचा कार्यकाळ देखील मला अनुभवायला मिळाला.

निलंगेकर कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध..

आम्ही नवखे आमदार असल्यामुळे प्रशासन कसं चालतं, योजनेची सखोल माहिती आदी अनेक गोष्टी आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. त्यांच्याकेड आम्ही एक मोठा आधार म्हणून पहायचो, वेळोवेळी त्यांचे झालेले मार्गदर्शन आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी व अविस्मरणीय राहणार आहे. माझे वडील स्वर्गीय भाऊ साहेब निलंगेकरांचे मित्र असल्यामुळे या कुटुंबाशी आमचे नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहे, असेही बाळासाहेब थोरात यांनी आवर्जून सांगितले. 

जुन्या संस्कृती जपणारा, एक मार्गदर्शक नेता आमच्यातून गेला आहे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे, भविष्यात आम्ही त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणार आहोत. एखाद्या कुटुंबप्रमुखा प्रमाणे त्यांना आम्हाला मार्गदर्शन केले. शासनात काम करत असतांना प्रशासकीय कामकाज कसे चालवायचे हे देखील निलंगेकर साहेबांकडून आम्हाला शिकायला मिळाल्याच्या भावना यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केल्या.
 

Edited By : jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com