पन्नास लाख बुडवल्याचा पुतण्याचा आरोप; प्रसिध्दीसाठीचा खटाटोप म्हणत काकांचा पलटवार

क्षीरसागर काका - पुतण्यांमध्ये राजकीय व विकास कामांवरुन आरोप प्रत्यारोप नवे नाहीत. आता माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सत्तेचा दुरपयोग करुन पालिकेचे ५० लाख रुपयांचे बेटरमेंट चार्जेस बुडविल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. तर, आरोप केवळ प्रसिद्धीसाठी आणि लोकांच्या सहानुभूतीसाठी असून सर्व कामे नियमाप्रमाणे केल्याचा खुलासा क्षीरसागर बंधूंकडून करण्यात आला.
Mla sanip kshirsagar news beed
Mla sanip kshirsagar news beed

बीड : क्षीरसागर काका पुतण्यांतील राजकीय द्वंद सुरु असतानाच इतर मुद्द्यांवरही आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नावे असलेल्या भुखंड विक्रीसाठी नगरपालिकेत ५० लाखांपेक्षा जास्त रुपयांचा बेटरमेंट चार्ज भरला नसल्याचा गंभीर आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याडे रितसर तक्रार केल्यानंतर त्याची सुनावणीही झाली. मात्र, सर्व कामे रितसर केल्याचे क्षीरसागर यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मालकीच्या सर्वे क्रमांक आठ व नऊ तरफ खोड मळ्यामधील भुखंडाचे क्षेत्रफळ आठ लाख ७५ हजार ५६३ चौरस फुट आहे. सदर क्षेत्राची खरेदी - विक्री करण्यासाठीचा बेटरमेंट चार्ज ५० लाखांपेक्षा जास्त आहे. मात्र, त्यांनी याबाबत पालिकेला मागीतलेल्या सवलतीच्या शपथपत्रावर तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी कुठलीही कार्यवाही केलेली नसताना सदर शुल्क पालिकेत भरले नसल्याचे संदीप क्षीरसागर यांचे म्हणणे आहे.

याबाबत २९ सप्टेंबरच्या सुनावणीत पालिकेच्या जनरलाईज ठरावात मान्यता देण्यात आली. परंतु या ठरावाचे कन्फरर्मेशन नगरपालिकेत सादर नसल्याचे किंवा मागणी प्रमाणे मान्यता देणारे कुठलेही पत्र उपलब्ध नसल्याचे उघड झाल्याचे संदीप क्षीरसागर सांगतात. भुखंड विकण्यासाठीची प्रक्रीया छाननणी २०११ साली झाली. त्या छाननीचे तीन हजार १५० रुपयांचे शुल्कही भरलेले नाही. भ्रष्टाचाऱ्यांना आपल्याकडे थारा नाही. क्षीरसागर बंधूंच्या प्रत्येक बोगस कामावर आपलं लक्ष राहणार असल्याचे संदीप क्षीरसागरांनी म्हटले आहे. आजपर्यंत जनतेचे जेवढे खाल्ले ते तर वापस घेणारच परंतु जे दोषी आहेत ते तर जेलमध्ये जातीलच, असा इशाराही त्यांनी दिला. 

प्रसिध्दीसाठी खोटे आरोप

दरम्यान, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ५० लाख बुडवल्याचा जावई शोध लावत जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. यातून जनतेची दिशाभूल करत क्षीरसागर बंधूंच्या बाबतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न संदीप क्षीरसागर करत असल्याचे जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. वर्षभरात चमकोगिरी करणाऱ्या आणि फुकटची प्रसिध्दी मिळवणार्‍या आमदाराला बीडकर चांगलेच ओळखून आहेत, अशी टिकाही त्यांनी केली.

 माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी मळ्याच्या प्लाटिंगचे बेटरमेंट चार्जेसचे ५० लाख बुडवल्याचा आरोप चुकीचा असून भ्रष्टाचाराबाबत कुठलेही ठोस पुरावे अथवा निकाल नाही. शासनाच्या परिपत्रकानुसार ले आऊट मंजूर झाल्यानंतर सदर प्लॉटचे संबंधीत खरेदीदाराकडून बेटरमेंट चार्ज वसूल करणे बाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यानंतरच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सदर लेआऊटमधील ४२ भूखंड विक्री केल्याचेही म्हटले आहे.

नगरपालिकेने एक लाख ११ हजार ८९५ रुपये बेटरमेंट चार्जेसपोटी वसूल केले असून त्याचा उल्लेख अहवालात आहे. लेआऊट मधील भूखंड विक्रीबाबत कोणतीही अनियमितता झाली नसल्याचे अहवालात आहे. तसेच विकसन फिस पोटी रूपये ३१५० जमा केल्याची पावती देखील अहवालासोबत आहे. अहवालाचा चुकीचा अर्थ लावून जेवढे पैसे खाल्ले तेवढे वापस घेणारच असे सांगून बीडकरांची सहानुभूती मिळवण्याचा केवीलवाणा प्रयत्न आमदारांकडून केला जात असल्याचा आरोप नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com