खड्डे चुकवणाऱ्या वाहनधारकांना मनसेकडून मानेचा पट्टा 

रस्त्यावरील खड्डे, पाणी साचून रस्त्यातच तयार झालेले तळे चुकवत मार्ग काढणाऱ्या वाहनधारकांना मनसेच्या वतीने बक्षीस देखील देण्यात आले. विशेष म्हणजे ही कसरत करणाऱ्या वाहनधारकांना भविष्यत कंबर, मान, पाठ दुखीची आजार जडू शकतो, हे लक्षात घेता बक्षीस म्हणून मनसेने कंबरेचा पट्टा, मानेचा पट्टा, हेल्मेट दिले.
mns protest against muncipal corporation news
mns protest against muncipal corporation news

औरंगाबाद ः कोरोनाच्या काळात महापालिकेसह संपुर्ण प्रशासकीय यंत्रणा या एकाच कामात जुंपली आहे. पण त्यामुळे शहरातील मुलभूत प्रश्न आणि समस्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांमध्ये भरपूर पाऊस झाला, काही भागात तर अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले. आधीच शहरातील रस्त्यांची दुरावस्था, त्यात पावसाने ठिकठिकाणी खड्डे झाले आहेत. प्रशासन मात्र त्याकडे पहायला तयार नाही. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेने अभिनव आंदोलन करत याकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. खड्डे चुकवा बक्षिस मिळवा आंदोलन करत मनसेने महापालिकेचा निषेध केला. 

शहरातील खड्ड्यांमुळे बेजार झालेल्या नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे ते बुजवण्यासाठी वारंवार अर्ज, विनंत्या केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पावसाचे पाणी खड्ड्यात साचून छोटे-मोठे अपघात आणि त्यात जखमी होणाऱ्या वाहनधारकांची संख्या देखील गेल्या काही दिवसांत वाढली. अखेर मनसेने शहर जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी साडेबाराच्या सुमारास आंदोलन केले.

सिडको एन-९ आंबेडकरनगर ते सोनामाता शाळा रस्त्यावरील खड्ड्यांकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने चक्क वाहनधारकांसाठी एक स्पर्धाच आयोजित केली. या अंतर्गत ‘ खड्डे चुकवा, बक्षीस मिळवा‘ असे आवाहन करण्यात आले. यावेळी रस्त्यावरील खड्डे, पाणी साचून रस्त्यातच तयार झालेले तळे चुकवत मार्ग काढणाऱ्या वाहनधारकांना मनसेच्या वतीने बक्षीस देखील देण्यात आले. विशेष म्हणजे ही कसरत करणाऱ्या वाहनधारकांना भविष्यत कंबर, मान, पाठ दुखीची आजार जडू शकतो, हे लक्षात घेता बक्षीस म्हणून मनसेने कंबरेचा पट्टा, मानेचा पट्टा, हेल्मेट दिले. मनसेच्या या अनोख्या आंदोलनाची शहरात चर्चा देखील झाली. 

शहर व जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बाधित रुग्णांची संख्या सोळा हजारांवर पोहचली आहे, तर आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे पाचशेहून अधिक जणांचे प्राण गेले आहे. त्यामुळे महापालिकेची सगळी यंत्रणा कोरोनाच्या कामात गुंतलेली आहे. कोरोना विरुध्दचा लढा जितका महत्वाचा आहे, तितकेच महत्व शहरातील नागरी प्रश्नांनाही आहे, हे नाकारून चालणार नाही. वारंवार महापालिकेला या खड्ड्यांबाबत माहिती आणि ते बुजवण्याची विनंती करून देखील या प्रश्नाकडे लक्ष दिले गेले नाही.

मनसेने हा मुद्दा हाती घेत ‘खड्डे चुकवा, बक्षिस मिळवा‘ स्पर्धेचे आयोजन करत महापालिका प्रशासनाला अंतर्मुख केले. आंदोलनातील वेगळेपणा मनसेने यावेळी दाखवून दिला. रस्त्यातील खड्डे चुकवण्यात यशस्वी झालेल्या वाहनधारकांना कंबर, मानेचा पट्टा व हेल्मेट बक्षिस म्हणून यावेळी देण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com