राज्यातील मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुका आता पुढील वर्षात..

महापालिकेच्या निवडणुका या वर्षी तरी होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनूसार या संदर्भात लवकरच नवा अद्यादेश काढून महापालिका निवडणुका आणखी पुढे ढकलण्यात आल्याचे सरकारकडूून जाहीर करण्यात येईल, असे ट्विट एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.
All muncipal corporations election posponed this year news
All muncipal corporations election posponed this year news

औरंगाबाद ः नवी मुंबई, औरंगाबादसह राज्यातील काही महापालिकांच्या निवडणुका कोरोना संकटामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या सर्व महापालिकांवर सध्या प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. मिशन बिगिन अंतर्गत राज्यातील स्थिती पुर्वपदावर आणण्यासाठी अनलाॅकचे अनेक टप्पे आपण पार करत आहोत. असे असले तरी महापालिकांच्या निवडणुका मात्र अद्याप घेण्यात येणार नसल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे आणखी काही महिने महापालिकेचा कारभार प्रशासकांच्याच हाती असणार आहे.

औरंगाबाद महापालिकेची मुदत संपल्यामुळे एप्रिल २०२० मध्ये निवडणुका होणार होत्या. परंतु मार्च महिन्यात राज्यासह देशभरात कोरोनाचे संकट आले आणि लाॅकडाऊनची घोषणा झाली. त्या्मुळे गेली सहा महिने देशासह राज्यातील सर्वच व्यवहार बंद होते. त्यामुळे राज्यातील मुदत संपलेल्या सर्वच महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येत असल्याचे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. या संदर्भात काढलेल्या आदेशात पुढी आदेश येईपर्यंत असा उल्लेख करण्यात आला होता.

आॅक्टाेबरमध्ये या अद्यादेशाची मुदत संपत असल्या्मुळे वर्षा अखेरीस दिवाळीनंतर महापालिकेच्या निवडणुका होतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र महापालिकेच्या निवडणुका या वर्षी तरी होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनूसार या संदर्भात लवकरच नवा अद्यादेश काढून महापालिका निवडणुका आणखी पुढे ढकलण्यात आल्याचे सरकारकडूून जाहीर करण्यात येईल, असे ट्विट एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. 

राजकीय पक्षांचा हिरमोड..

महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होऊन रुग्णांची संख्या देखील घटली आहे. राज्य सरकारने  देखील दिवाळीनंतर संपुर्ण अनलाॅक केले जाईल,  असे संकेत दिले आहेत. त्यामुळे मुदत संपलेल्या महापालिकेच्या निवडणुका देखील वर्ष अखेरीस होतील अशी अपेक्षा राजकीय पक्ष आणि इच्छुकांना होती. त्यादृष्टीने औरंगाबादेत शिवसेना, काॅंग्रेस, भाजप व अन्य पक्षांनी तयारी देखील सुरू केली. परंतु अद्यापही निवडणुका होणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यामुळे आता राजकीय पक्ष आणि त्यांच्या इच्छुकांचा देखील हिरमोड झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com