खासदार जाधव धमकी प्रकरणी नांदेडमधून एका संशयिताला ताब्यात घेतले

गेल्या तीस-पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक कटु प्रसंग अनुभवले पण माझे कुणाशी वैर नव्हते. राजकीय मतभेद किंवा वैमनस्य असेलही, पण जीवे मारण्याची धमकी, सुपारी देणे हा प्रकार म्हणजे अतिशय गंभीर आणि चिंता करायला लावणार आहे. मी ही धमकी सहज घेत नाही, पण मलाही कुणी सहज घेऊ नये, असा इशाराही संजय जाधव यांनी दिला.
mp sanjay jadhav threating update news parbhani
mp sanjay jadhav threating update news parbhani

परभणी ः शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जीवे मारण्यासाठी परभणीतील कुणी तरी दोन कोटी रुपयांची सुपारी दिल्याची तक्रार दोन दिवसांपुर्वी स्वतः जाधव यांनी नानल पेठ पोलिस ठाण्यात दिली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले होते. धमकी प्रकरणाचे धोगेदोरे नांदेडच्या रिद्वा गॅगशी असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज नांदेडमधून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी दोन कोटी रुपयांची सुपारी परभणीतून मिळाल्याची चर्चा नांदेडमध्ये दोन तरूण करत असल्याची माहिती जाधव यांना समजली.  त्यानंतर त्यांनी तातडीने नानलपेठ पोलीस स्टेशन गाठून सविस्तर तक्रार दाखल केली होती. खासदारांनाच जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे संपुर्ण जिल्ह्यात एकच खलबळ उडाली होती.

पोलिसांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेत तातडीने स्थानिक पोलीसांचे एक पथक स्थापन करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणात आज एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या संशयिताकडून काय माहिती मिळते, त्याचा रिद्धां टोळीशी काही संबंध आहे का? नेमकं या सुपारी प्रकरणामागे कोण आहे? या संदर्भात संशयिताकडून काही माहिती मिळते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

दरम्यान, संजय जाधव यांनी या धमकी प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या देखील कानावर घातली आहे. प्रकरण गंभीर असल्यामुळे परभणी पोलिसांना तातडीने चौकशीचे आदेश देऊन या प्रकरणामागे कोण आहे? याचा छडा लवकरात लवकर लावावा, अशी विनंती आपण केली असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

गेल्या तीस-पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक कटु प्रसंग अनुभवले पण माझे कुणाशी वैर नव्हते. राजकीय मतभेद किंवा वैमनस्य असेलही, पण जीवे मारण्याची धमकी, सुपारी देणे हा प्रकार म्हणजे अतिशय गंभीर आणि चिंता करायला लावणार आहे. मी ही धमकी सहज घेत नाही, पण मलाही कुणी सहज घेऊ नये,  असा इशाराही संजय जाधव यांनी दिला. 

कोण, कुठली रिद्धा गॅंग मला माहित नाही, पण मला जीवे मारण्यासाठी एवढ्या मोठ्या रक्कमेची सुपारी तीही परभणीतून कुणी दिली, याचा तपास लागणे गरजेचे आहे. आतापर्यंत व्यापाऱ्यांना धमक्या दिल्या जात होत्या, आता थेट खासदार आणि राजकीय पुढाऱ्यांना धमक्या मिळत असल्याने यांची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचेही खासदार जाधव म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com