मोदीजी ‘गो कोरोना‘ म्हणत थाळी वाजवली, आता ‘जीडीपी‘साठी ढोल बडवणार?

महाराष्ट्र व माझ्या मराठवाड्यात कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीयेत. व्हेंटिलेटर आहेत, तर बेड नाही, बेड आहे तर आॅक्सीजन नाही अशी परिस्थीती आहे. संपुर्ण जग कोरोनाशी लढा देत असतांना पंतप्रधानांनी देशातील जनतेला थाळी वाजवायला लावली, दिवे लावायला सांगितले. यामुळे जगभरात आपली नाचक्की झाल्याचा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला.
mp imtiaz jalil  news
mp imtiaz jalil news

औरंगाबाद ः देशात कोरोनाचा कहर वाढला, लाखो लोकांना या महामारीने आपल्या कव्हेत घेतले, तर हजारो जणांना आपले प्राण मुकावे लागले. तेव्हा या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठीची व्यवस्था निर्माण करण्याऐवजी तुम्ही ‘गो कोरोना गो‘ म्हणत लोकांना थाळी वाजवून दिवे लावायला सांगितले. आता देशाचा जीडीपी रसातळाला गेला आहे, आता उठ जीडीपी उठ म्हणत ढोल बडवणार का? असा सवाल उपस्थित करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोदी सरकारवर संसदेत टिका केली. थाळी आणि दिवे लावण्याच्या प्रकारामुळे आपली केवळ देशातच नाही तर जगभरात छिथू झाल्याचेही जलील यांनी आपल्या निवेदनात म्हटले.

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल संसदेत देशातील कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य करतांना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना अनेक सवाल करत सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला. शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नांवर निवेदन करतांना कृषी विधेयकाला विरोध दर्शवल्यानंतर काल संसदेत इम्तियाज यांनी आरोग्य मंत्र्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. इम्तियाज जलील म्हणाले, जगभरात असलेल्या भारतीयांना देशात परत आणण्यासाठी सरकारने विशेष विमानांची सोय केली. पण आपल्याच देशातील गोर-गरीब मजुरांना मात्र रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिले. 

चार महिन्यांपुर्वी माझ्या मतदरासंघाजवळ आपल्या मध्यप्रदेशातील गावाकडे पायी निघालेल्या १६ मजुरांना रेल्वेने चिरडले होते. घटनास्थळी मी जेव्हा गेलो तेव्हा पोलिस या मृतदेहांचे अक्षरशः तुकडे गोळा करत होते. रेल्वेने हा अपघात असल्याचे सांगितले, पण तो अपघात नव्हता तर व्यवस्थेने केलेल्या हत्या होत्या. आजही माझा हाच आरोप आहे, जगभरातील श्रीमंताचे जीव सरकारला महत्वाचे वाटले पण, गरीबांना रस्त्यावर किड्या-मुंग्यासारखे चिरडून मरण्यासाठी सरकारने सोडून दिले.

आज देशातील कोरोनाची परिस्थीती भयंकर बनली आहे. ज्या बाहेरच्या देशात कोरोनाने हजारो, लाखो बळी घेतले ते देश या परिस्थितीतून सावरले आहे. आपण मात्र अजूनही कोरोना रोखण्यासाठीची यंत्रणा उभारण्यात सपशेल अपयशी ठरलो आहोत. महाराष्ट्र व माझ्या मराठवाड्यात कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीयेत. व्हेंटिलेटर आहेत, तर बेड नाही, बेड आहे तर आॅक्सीजन नाही अशी परिस्थीती आहे. संपुर्ण जग कोरोनाशी लढा देत असतांना पंतप्रधानांनी देशातील जनतेला थाळी वाजवायला लावली, दिवे लावायला सांगितले. यामुळे जगभरात आपली नाचक्की झाल्याचा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला.

आज देशाच्या जीडीपीची काय अवस्था आहे? ती कशी सुधारेल यावर कुणी बोलायला तयार नाही. ‘गो कोरोना गो‘, म्हणत पंतप्रधानांनी थाळी वाजवायला लावली होती, आता उठ जीडीपी उठ म्हणून ढोल बडवायला मोदीजी सांगणार आहेत का? यासाठी त्यांना शुभेच्छा असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी आपल्या निवेदनात लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com