शिंदे गटातील आमदार म्हणतात, 'आमचं चुकलं' : चंद्रकांत खैरेंचा दावा

Chandrakant Khaire News : शिंदे गटासोबत गेलेले 10 ते 12 आमदार पुन्हा शिवसेनेत परतणार, असा विश्वास खैरेंनी व्यक्त केला आहे.
Mla Sanipan Bhumre-Chandrakant Khaire News Aurangabad
Mla Sanipan Bhumre-Chandrakant Khaire News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : माजी खासदार व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. संदीपान भुमरे हे गावठी मंत्री आहेत, त्यामुळे ते काहीही बोलत राहतात, अशा शब्दात त्यांनी भुमरेंवर टीका केली. “शिंदे गटात गेलेले काही आमदार मला फोन करुन म्हणतात की, 'आमचं चुकलं.' तिकडे गेलेले 10 ते 12 आमदार पुन्हा शिवसेनेत परतणार आहेत, असा विश्वास खैरेंनी (Chandrakant Khaire) व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

Mla Sanipan Bhumre-Chandrakant Khaire News Aurangabad
पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर; रोहिणी खडसेंप्रमाणे पाऊल उचलण्याचे आवाहन

“उद्धव ठाकरेंसोबत असणारे दोन आमदार आमच्या संपर्कात असून ते लवकरच आमच्यासोबत सामील होतील”,असा खळबळजनक दावा संदिपान भुमरे यांनी बोलवून दाखवला होता. यावरच आता खैरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. “आमच्याकडचे कुणीही तिकडे जाणार तर नाहीच, याउलट त्यांचेच 40 आमदार आमच्याशी संपर्क करत आहेत. शिंदेसोबत असलेले अनेक आमदार फोन करुन म्हणत आहेत की, 'आमचं चुकलं.' त्यामुळे शिंदेंसोबत गेलेले 10-12 आमदार मूळ शिवसेनेत परत येणार आहेत” असं विश्वास खैंरेंनी व्यक्त केला आहे.

Mla Sanipan Bhumre-Chandrakant Khaire News Aurangabad
काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी...ते फुटणार की... : शहाजीबापूंच्या बॉम्बगोळ्याने खळबळ

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे आणखी दोन आमदार फुटणार असं वक्तव्य, भुमरे यांनी केले होते. हे दोन आमदार कोण, यावरुन चर्चांना उधाण आले होते. उद्धव ठाकरे यांच्याकडील आमदारांची संख्या तुलनेने आधीच कमी आहे. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता दिसत होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com