शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदारांचा कृषी मंत्र्यांना बांधावरून फोन..

हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने गेला, खरिपाचा हंगामही धोक्यात आला आहे. अजूनही पावसांचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आर्थिक मदत द्या, अशी मागणी राहूल पाटील यांनी दादा भुसे यांच्याकडे केली.
mla rahul patil assuer farmars for help news
mla rahul patil assuer farmars for help news

परभणी ः माझ्या परभणी मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील शेतकरी गेल्या चार-पाच वर्षांपासून कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाशी सामना करत आहेत. यंदा चांगली पीके बहरलेली असताना सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो एकर शेतातील मुग, उडीद, सोयाबीन कापूस व ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला असून त्याला पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे, अशी मागणी करणारा फोन शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांना केला.

राज्यात विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके, फळबागांचे नुकसान झाले तर काही ठिकाणी शेतजमीनीच वाहून गेली. अजूनही पंचनामे पुर्ण झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळेल याचा भरवसा नाही. कृषी मंत्री दादा भुसे यांनी नुकताच मराठवाडा दौरा करून येथील नुकसानाची पाहणी करून संबंधित यंत्रणेला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. राज्यातील एकत्रित आढावा घेऊन तो मंत्रीमंडळासमोर ठेवल्यानंतरच किती आणि कशी मदत करायची याचा निर्णय होणार आहे.

आमदार राहुल पाटील यांनी आज तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांना सोबत घेऊन मतदारसंघातील धार, समसापूर, मांगणगाव, मटकऱ्हाळा व इतर गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली. सरसकट पंचनामे करण्यास अगोदर टाळाटाळ केली जात असल्याने थेट बांधावरून शेतकऱ्यांसमोर राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना त्यांनी फोन केला.

हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने गेला, खरिपाचा हंगामही धोक्यात आला आहे. अजूनही पावसांचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आर्थिक मदत द्या, अशी मागणी राहूल पाटील यांनी दादा भुसे यांच्याकडे केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितच मदत करेल. त्यासाठी मी कायम पुढाकार घेईल, शेतकरी एकटा नाही. मी स्वतः व माझा पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने सक्षमपणे उभा राहिल. गरज पडल्यास थेट मुख्यमंत्र्यांना बोलू. परंतू परभणी मतदार संघातील एकाही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही,असा शब्द देखील राहुल पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com