शिक्षक आमदारांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाचे `हालगी`वाजवून आंदोलन

राज्यातील मराठा नेते, खासदार, आमदार यांनी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत, असा आरोप मराठा क्रांत मोर्चाने केला आहे. या नेते आणि लोकप्रतिनिधींनी आतातरी गंभीर व्हावे, यासाठी राज्यभरात मंत्री, खासदार, आमदार यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलने केली जात आहेत.
Halgi andolan latur news
Halgi andolan latur news

लातूर ः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्या संदर्भात तसेच हे आरक्षण टिकून राहण्यासाठी शासनाने अध्यादेश काढावा तसेच अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी फेरविचार याचिका दाखल करत कायदेशीर बाबींची पुर्तता करावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा आक्रमक होत आहे. गेल्या काही दिवसापासून खासदार -आमदारांच्या घरासमोर आंदोलन करून त्यांनी सरकारकडे पाठपुरावा करावा यासाठी जागे केले जात आहे. रविवारी शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या घरासमोर हालगी वाजवून आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चाने ५८ मूक मोर्चा काढले आहेत. अनेक रास्तारोको आंदोलन केली, तर  ४२ मराठा बांधव आरक्षणाच्या लढ्यासाठी हुतात्मा झाले. यातून शासनाने गायकवाड आयोग नेमला. २०१८ मध्ये समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळाले होते. पण याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर स्थगिती मिळाली. यामुळे समाजात असंतोष आहे. हे आरक्षण टिकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने योग्य पावले उचलली नाहीत असा, आरोप देखील होत आहे.

शिवाय राज्यातील मराठा नेते, खासदार, आमदार यांनी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत, असा आरोप मराठा क्रांत मोर्चाने केला आहे. या नेते आणि लोकप्रतिनिधींनी आतातरी गंभीर व्हावे, यासाठी राज्यभरात मंत्री, खासदार, आमदार यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलने केली जात आहेत.

शासनाने आता मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढावा, अंतरिम स्थगिती उठवण्य़ासाठी फेरविचार याचिका दाखल करावी यासह स्थगितीच्या आदेशापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश मिळाले आहेत त्यांना संरक्षण द्यावे, आदेशापू्र्वपर्यंत प्रकाशित झालेल्या जाहिरातींचा आधार घेवून प्रवेश व भरती करावी, स्थगिती आदेश उठेपर्यंत पोलिस तसेच कोणतीही मेगा भरती करू नये, एमपीएससीच्या होवू घातलेल्या परीक्षा संदर्भात मराठा मुलांनी एसईबीसीच्या कोट्यातून अर्ज भरले आहेत, त्याचे काय होणार याचा खुलासा सरकारने करावा.

सारथी संस्थेसाठी दोन हजार कोटीची तरतूद करण्य़ात यावी, सारथी संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या मोफत कोचिंग, सीईटी एनईटी परीक्षा तयारी, सैन्य प्रशिक्षण, अशा अभ्यासक्रमाच्या योजना तयार करून प्रशिक्षण द्यावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी एक हजार कोटीची तरतूद करावी आदी मागण्या मराठा क्रांती मोर्चाकडून केल्या जात आहेत. 

काही दिवसापासून मंत्री, खासदार, आमदारांच्या घरासमोर आंदोलन केले जात आहे. याचाच भाग म्हणून आमदार विक्रम काळे यांच्या घरासमोर हालगी वाजवून आंदोलन करण्यात आले. यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काळे यांना मागण्याचे निवेदनही देण्यात आले.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com