मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजय मिळवत पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवा.. - Make the faith shown by the party meaningful by winning the Marathwada graduate election | Politics Marathi News - Sarkarnama

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजय मिळवत पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवा..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

हा पक्ष चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला नाही. पक्ष मोठा करण्यासाठी अनेकांनी रक्त सांडले,आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी, पक्षासाठी दिले, तेव्हा हे दिवस दिसत आहेत. अशा पक्षाचे तुम्ही पदाधिकारी झाला आहात, त्यामुळे जबाबदारी अधिक वाढली आहे. कोणत्याही परिस्थितीत आपला उमेदवार विजयी झालाच पाहिजे.

औरंगाबाद ः पद मिळवणे सोपे असते, पण त्याचे रूपांतर नेतृत्वात  करणे अवघड. त्यासाठी सातत्याने कार्यरत राहावे लागते, तुम्हाला मिळालेले नियुक्ती पत्र घरात ठेवण्यासाठी नाही, तर पक्षाने तुमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आहे. पदवीधर निवडणूकीत शिरीष बोराळकरांना पहिल्या पसंतीची अधिकाधिक मतांनी विजयी करत पक्षाने तुमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवा, असे आवाहन भाजपचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीया यांनी केले.

शहर ओबीसी आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भारतीया यांच्या हस्ते नुकतेच भाजपच्या विभागिय पदवीधर प्रचार कार्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले. पक्षाने तुम्हाला ताकद दिली आहे, आपण सक्षम आहात म्हणून हि जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात आली आहे. पण नियुक्ती पत्र घेऊन शांत बसू नका, तर येणाऱ्या एक डिसेंबर रोजी पदवीधर निवडणूकमध्ये समोर असलेल्या विरोधकाला धूळ चारत बोराळकरांना विजयी करा. ओबीसी आघाडीची मते निर्णायक आहेत. मनापासून ठरवले तर मराठवाडा पदवीधर निवडणूक जिंकणे अवघड नाही, असा विश्वासही भारतीया यांनी व्यक्त केला.

हा पक्ष चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला नाही. पक्ष मोठा करण्यासाठी अनेकांनी रक्त सांडले,आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी, पक्षासाठी दिले, तेव्हा हे दिवस दिसत आहेत. अशा पक्षाचे तुम्ही पदाधिकारी झाला आहात, त्यामुळे जबाबदारी अधिक वाढली आहे. कोणत्याही परिस्थितीत आपला उमेदवार विजयी झालाच पाहिजे, असे आवाहन देखील भारतीया यांनी उपस्थितांना केले.

प्रत्येकाला न्याय मिळतोच...

पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या विचारधारेनूसार भारतीय जनता पक्षाने अठरा पगड जाती, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन ही ओबीसी आघाडी तयार केली आहे. या पक्षात प्रत्येकाला न्याय मिळतो, पण त्यासाठी आपली योग्यता, आणि कर्तृत्व सिद्ध करावे लागते, असे मत शहर-जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी यावेळी व्यक्त केले. तर  पदवीधर निवडणुकीसाठी चांगले नियोजन झाल्याचे सांगत हेच सात्यत कायम ठेवले तर बोराळकरांना विजयी करून आपण स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पुर्ण करू शकतो, असे खासदार डाॅ. कराड यांनी सांगितले. 

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख