भाजप नगरसेवकांची बंडखोरी, कुंडलावाडी नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा

गेल्या चार वर्षापासून नगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता होती. पण भाजपच्या सत्ताधारी नेत्याच्या एकाधिकारशाहीमुळे आज भाजपाच्या पाच नगरसेवकांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीच्या सुरेखा जिट्ठावार यांना विजयी केले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाचे पानिपत झाले.
Kundalwadi nagrpalika victory news
Kundalwadi nagrpalika victory news

कुंडलवाडी : नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत नगरपालिकेवरील भाजपाकडील सत्ता खेचून महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या सुरेखा जिठ्ठावार यांनी भाजपच्या शेख रिहाना यांचा चार मतांनी पराभव करत नगराध्यक्षपद पटकावले. राज्यातील बदललेल्या सत्ता समीकरणाचा फटका भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये बसतांना दिसतो आहे.

कुंडलवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. आरुणा कुडमूलवार यांनी जात वैद्यता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना नगररचना विभागाने अपात्र ठरवले होते. त्यानंतर नव्या नगराध्यक्षांच्या निवडीसाठीची प्रक्रिया गुरुवारी सकाळी नगरसेवकांची व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे विशेष सभा घेऊन पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजप उमेदवाराचा दहा विरुध्द सहा अशा मतांनी पराभव केला. महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुरेखा नरेश जिठ्ठावार यांना १० मते मिळाली, तर भाजपच्या शेख रिहाना पाशामियॉ यांना सहा मते मिळाली. तर मतदान प्रक्रियते एक सदस्य तठस्थ राहिला.
 
महाविकास आघाडीच्या बाजूने शिवसेनेच्या सुरेखा नरेश जिट्ठावार, शैलेश ऱ्याकावार, काँग्रेसचे शेख मुख्त्यार खाज्यामियॉ, नंदाबाई अशोक कांबळे, सावित्रा पोषटी पडकुटलावार, भाजपचे सचिन कोटलावार, शंकुतला गंगाधर खेळगे, प्रयागबाईं मुरलीधर शिरामे, सुरेश कोंडावार, शंकर गोणेलवार यांनी मतदान केले.

तर भाजपाच्या बाजूने विठ्ठल कुडमूलवार, अनिता पुप्पलवार, अशोक पाटील खुळगे, शेख रिहाना पाशामियॉ, शिवसेनेचे गंगाप्रसाद गंगोने, काँग्रेसचे गंगामणी संजय भास्कर यांनी मतदान केले आहे. तर विना नागेश कोटलावार या तटस्थ राहिल्या. महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या जिठ्ठावार यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरात फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

यावेळी निवडणूक पीठासीनअधिकारी म्हणुन उपविभागीय जिल्हाधिकारी शरद झाडके, प्रभारी मुख्याधिकारी नीलम कांबळे यांनी काम पाहिले. यावेळी आमदार अमर राजुरकर, रावसाहेब अंतापुरकर, माजी आमदार सुभाष साबणे, शिक्षण सभापती संजय बेळगे, शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, विक्रम साबने, संतोष कुलकर्णी, नगरसेवक संदिप सोनकांबळे, शिवाजी पाटील पाचपिपलीकर, विश्वनाथ समस, शंकर मावलगे, सुनील बेजगमवार, राजू पोतनकर, प्रदिप आंबेकर, शेख मुख्त्यार, शैलेश ऱ्याकावार, भीम पोतनकर, सचिन पाटिल, अभिजीत धरमुरे आदिसह काँग्रेस, शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शहरात पोलिसांचा कडक बदोबस्त ठेवण्यात आला होता.

भाजपाला आत्मपरिक्षण करण्याची गरज

गेल्या चार वर्षापासून नगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता होती. पण भाजपच्या सत्ताधारी नेत्याच्या एकाधिकारशाहीमुळे आज भाजपाच्या पाच नगरसेवकांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीच्या सुरेखा जिट्ठावार यांना विजयी केले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाचे पानिपत झाले असून कुंडलवाडी भाजपाला आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे बोलले जाते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com