अंगावर पीपीई कीट चढवत केंद्रेकरांनी केली कोविड सेंटरची पाहणी

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मंगळवारीसुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन प्लॅंटच्या कामास भेट देवून पाहणी केली. त्यानंतर आयुक्त रुग्णालयातून निघून जातील असे अधिकाऱ्यांना वाटत असतांनाच अचानक त्यांनी कोव्हिड सेंटरकडे मोर्चा वळवीला. मला कोरोना बाधित रुग्णांशी बोलायचे आहे असे सांगत त्यांनी पीपीई किटची मागणी केली.
divisional commissinor kendrekar visit covid center news
divisional commissinor kendrekar visit covid center news

परभणी ः  वारंवार सूचना, ताकीद देऊनही परभणी जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार सुधरत नसल्याने अखेर आज विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी अंगावर पीपीई कीट चढवत कोविड सेंटरला भेट देत तेथील सोयीसुविधांची पाहणी करत कोरोना बाधित रुग्णांची विचारपूस केली. त्यांनतर वेळी सुधारणा करा अन्यथा परिणामाला तयार राहा, असा सज्जड दम देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

कोरोना बाधित रुग्णांचे घर दिसले तरी ह्रदयात धडकी भरते. परंतू विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी (ता.११) थेट कोव्हिड सेंटरमध्ये जावून कोरोनाबाधित रुग्णांची विचारपुस केली. दरम्यान, आयुक्तांनी कोव्हीड सेंटरच्या आत स्वतः जावून पाहणी केल्याने जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. 

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाचा अनागोंदीपणा कोरोना विषाणु संक्रमणामुळे समोर आला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या उपचारात केली जाणारी दिरंगाई ही सर्वश्रुत आहे. सुनील केंद्रेकर यांनी जिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभाराबद्दल जाहीर बैठकामधून नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना खडे बोल यापुर्वी देखील सुनावले , परंतू  परिस्थिती जैसे थे आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मंगळवारी सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन प्लॅंटच्या कामास भेट देवून पाहणी केली. त्यानंतर आयुक्त रुग्णालयातून निघून जातील असे अधिकाऱ्यांना वाटत असतांनाच अचानक त्यांनी कोव्हिड सेंटरकडे मोर्चा वळवीला. मला कोरोना बाधित रुग्णांशी बोलायचे आहे असे सांगत त्यांनी पीपीई किटची मागणी केली.

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृ्थ्वीराज बी.पी. यांच्यासह इतर अधिकाऱ्यांसह आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कोरोना केंद्रात प्रवेश केला. त्या ठिकाणी रुग्णांशी हितगुज करत सोयी सुविधाची माहिती घेतली. परंतू या ठिकाणी रुग्णांची होत असलेली हेळसांड पाहून आयुक्तांचा पार चढला. त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना धारेवर धरत याचा जाब विचारला. वेळीच सुधारणा करा अन्यथा परिणामाला तयार रहा, अशा कठोर शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले.

रॅपीड टेस्टकरिता १२ केंद्र
परभणी महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने १२ केंद्र सुरू करीत रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट सुरू कराव्यात, असे आदेश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी महापालिका आयुक्त देविदास पवार यांना दिले आहेत. आयुक्त केंद्रेकर यांनी महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. शहरात सध्या केवळ चारच केंद्राद्वारे टेस्ट सुरु आहेत.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com