तू मारलेला यादगार फटका भारतीय कधीच विसरणार नाहीत

महाविकास आघाडीतील तरुण मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचे क्रिकेट प्रेम सर्वश्रुत आहे. आपल्या मतदारसंघात म्हणेज परळीमध्ये ते दरवर्षी क्रिकेटच्या स्पर्धा भरवात आणि त्यात हिरारीने सहभागी देखील होतात. त्यामुळे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या क्रिकेटमधून निवृती घेतल्या निर्णयानंतर अवघ्या काही मिनिटांतच धनंजय मुंडे यांनी आपल्या या लाडक्या खेळाडूबद्दलच्या आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या.
dhnanjay munde reaction on dhonis retierment news
dhnanjay munde reaction on dhonis retierment news

औरंगाबाद ः  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे. धोनीच्या निवृत्तीचे वृत्त समजताच धनंजय मुंडे यांनी ट्विटर अकाऊंटवर धोनी सोबतचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘बॅटिंग करताना तू मारलेला प्रत्येक यादगार फटका, किपिंग करताना तू अनेकांच्या उडवलेल्या दांड्या आणि कर्णधार म्हणून घेतलेला एक एक निर्णय आणि क्रिकेटचा इतिहास भारतीय रसिक कधीच विसरणार नाहीत! तुझा खेळ सदैव आठवणीत राहील'. अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी धोनीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली.

ग्रेट मॅच फिनिशर, कॅप्टन कुल आणि सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून ख्याती असलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने अखेर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. १५ आॅगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनाचा महुर्त साधत इन्स्टाग्रामवर ‘ मै पल दो पल का शायर हू, पल दो पल की मेरी कहानी‘ है म्हणत धोनी आपल्या कोट्यावधी चाहत्यांना धक्का दिली.

महाविकास आघाडीतील तरुण मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचे क्रिकेट प्रेम सर्वश्रुत आहे. आपल्या मतदारसंघात म्हणेज परळीमध्ये ते दरवर्षी क्रिकेटच्या स्पर्धा भरवात आणि त्यात हिरारीने सहभागी देखील होतात. त्यामुळे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या क्रिकेटमधून निवृती घेतल्या निर्णयानंतर अवघ्या काही मिनिटांतच धनंजय मुंडे यांनी आपल्या या लाडक्या खेळाडूबद्दलच्या आठवणींना उजाळा देत भावना व्यक्त केल्या. धोनी सोबत काढलेले छायाचित्र आपल्या ट्वीटर पोस्ट करत धोनीच्या क्रिकेट कारकीर्दीचा उल्लेख अगदी मोजक्या आणि समर्पक शब्दांत केला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याठी धोनीने इन्स्टांग्रामचे माध्यम निवडले. साडेचार मिनिटांचा एक व्हिडिओ पोस्ट करत धोनीने आपल्या संपुर्ण क्रिकेट कारकीर्दीतील काही ठळक प्रसंगावर प्रकाश टाकला. विशेष म्हणजे यासाठी धोनीने कभी कभी या चित्रपटातील प्रसिद्ध ‘ मै पल दो पल का शायर हू, पल दो पल की मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है‘ या गीता अगदी खुबीने वापर केला. गेल्या अनेक महिन्यांपासून धोनीच्या निवृतीची चर्चा क्रिकेट जगतात सुरू होती. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल स्पर्धा खेळणार आहे. ३९ वर्षीय धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतांना ‘सर्वांनी दिलेले प्रेम आणि पाठिंब्याबद्दल चाहत्याचे आभार मानले आहे. आज संध्याकाळी ७.२९ पासून मला निवृत्त समजलं जावं‘, असेही धोनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com