तर `त्या' भागात लॉकडाऊन4 लागू होईल - अमित देशमुख

लातूर जिल्हा सध्या ऑरेंज झोनमध्ये आहे. आपल्या जिल्ह्याला रेड झोनमध्ये जाण्याची वेळ येऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. यासाठी अधिक दक्ष रहायला हवे. लातूरला पुन्हा एकदा ग्रीन झोन मध्ये आणणे शक्य आहे. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, अशी अपेक्षा पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
if not taken care lockdown4 will be imposed says amit deshmukh
if not taken care lockdown4 will be imposed says amit deshmukh

लातूर : लातूर जिल्हा सध्या ऑरेंज झोनमध्ये आहे. आपल्या जिल्ह्याला रेड झोनमध्ये जाण्याची वेळ येऊ नये, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. यासाठी अधिक दक्ष रहायला हवे. लातूरला पुन्हा एकदा ग्रीन झोन मध्ये आणणे शक्य आहे. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, अशी अपेक्षा पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली. 

ज्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत, योग्य ती काळजी घेतली जात नाही, त्या भागात नक्कीच लॉकडाऊन 4 लागू होईल. हे उघड आहे, असेही ते म्हणाले.

'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी फेसबुक लाईव्ह वरून शनिवारी (ता. 9) नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाच्या विरोधात आपला लढा सुरू आहे. तो आणखी किती दिवस सुरू राहणार आहे, हे कोणाला माहिती नाही. दुसरीकडे, लस तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यालाही आणखी किती दिवस लागतील? हे कोणाला सांगता येत नाही. त्यामुळे कोरोना पसरू न देणे, त्यासाठी नियमांचे पालन करणे हाच एकमेव उपाय सध्या आपल्या हातात आहे.

पालकमंत्री म्हणून मी बारकाईने काम करत आहे. लातुर जिल्ह्यात आणखी कोरोना वाढणार नाही, यासाठी प्रशासनाला वेळोवेळी सूचना देत आहे. नागरिकांकडून येणाऱ्या सूचनासुद्धा स्वीकारल्या जात आहेत. सध्याची स्थिती लवकरात लवकर संपुष्टात यावी, यासाठीच हे प्रयत्न आहेत. या कामात तुम्ही मला साथ द्या, असे आवाहन देशमुख यांनी केले. 

उदगीरमध्ये 1 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. एकाचे आता 22 रुग्ण झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक पातळ्यांवर खबरदारी घेणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री म्हणाले...

  • खताचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घेऊ
  • विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. विनाकारण ताण घेऊ नये. 
  • उजनीचे पाणी लातुरात येईल, हा शब्द कायम आहे
  • लपून-छपून, आडमार्गाने कोणाला गावात येऊ देऊ नका, यांची माहिती प्रशासनाला कळवा
  • 'कोरोनामुक्त लातूर'साठी नागरिकांचे सहकार्य कौतुकास्पद आहे.
  • कोरोनाचा धोका टळला नाही. आणखी जागरूक राहूया.
     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com