पत्रकारिता केलेले खासदार म्हणतात, मी न्यूज चॅनेल पाहणे बंद केले

शेतकऱ्यांच्या आत्म्हत्या, शेतीचे प्रश्न, पाणी टंचाई, कुषोषण, आरोग्य असे विषय केवळ जुजबी माहितीच्या आधारे नाही, तर शोध पत्रकारिता करून मांडले जायचे, ते सोडवण्साठी प्रयत्न केले जायचे. आजची परिस्थिती मात्र अगदी त्या उलट आहे. सामाजिक आणि जनेतच्या प्रश्नांना दुय्यम स्थान मिळू लागले आहे, भांडण लावणारी पत्रकारिता आज कुठलेही विशेषतः हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनेल लावले तर आपल्याला पहायला मिळते.
mp imtiaz jalil stop watching news chanel news
mp imtiaz jalil stop watching news chanel news

औरंगाबाद ः राजकारणात येण्यापुर्वी वीस वर्ष पत्रकारिता केलेले आणि सध्या खासदार असलेले इम्तियाज जलील यांनी ‘मी न्यूज चॅनेल पाहणे बंद केले‘ असे जाहीर केले आहे. आजची पत्रकारिता ही समाजामध्ये तेढ निर्माण करणारी, भांडण लावणारी आणि सामाजिक प्रश्नांपेक्षा उथळ, टीआरपीला महत्व देणारी असल्याचा आरोप इम्तियाज यांनी केला आहे. आपल्या ट्विटर हॅन्डलवरून प्रसारमाध्यमांबद्दलची आपली तिखट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

औरंगाबादचे विद्यमान खासदार तथा एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा राजकीय प्रवास सुरू होण्यापुर्वी ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. डीजीटल मिडियामध्ये बारा वर्षाहून अधिक काळ काम केलेले इम्तियाज जलील आज ‘ मी न्यूज चॅनेल पाहणे बंद केले‘ असे म्हणत असल्यामुळे सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी नेमकी ही भूमिका का घेतली?

या संदर्भात सरकारनामाशी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, हो हे खरं आहे, की मी न्यूज चॅनेल पाहणे कधीचे बंद केले आहे. ज्या माणसाने आयुष्याची वीस वर्ष या क्षेत्रात घालवली त्या व्यक्तीने असा निर्णय घेणे याबद्दल प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि यापुढेही राहीन. लोकांच्या दैनंदिन गरजा, आरोग्य, शिक्षण, निवारा या प्रश्नांना आता प्रसारमाध्यमांमध्ये कवडीची किंमत राहिलेली नाही असे माझे ठाम मत झाले आहे.

मला आठवते मी स्वतः न्यूज चॅनेलला पत्रकार म्हणून काम करत असतांना आपली एखादी स्टोरी प्राईम टाईमवर लागावी यासाठी आम्ही खूप मेहनत घ्यायचो. अगदी जो विषय मांडायचाय त्याच्या खोलात जाऊन माहिती, व्हिडिओ मिळवणे यासाठीची धडपड असयाची. आठ दिवस मेहनत आणि तयारी केल्यानंतर जेव्हा ती स्टोरी, विषय प्राईम टाईमला लागायचा तेव्हा वेगळंच समाधान असायचं.

शेतकऱ्यांच्या आत्म्हत्या, शेतीचे प्रश्न, पाणी टंचाई, कुषोषण, आरोग्य असे विषय केवळ जुजबी माहितीच्या आधारे नाही, तर शोध पत्रकारिता करून मांडले जायचे, ते सोडवण्साठी प्रयत्न केले जायचे. आजची परिस्थिती मात्र अगदी त्या उलट आहे. सामाजिक आणि जनेतच्या प्रश्नांना दुय्यम स्थान मिळू लागले आहे, भांडण लावणारी पत्रकारिता आज कुठलेही विशेषतः हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनेल लावले तर आपल्याला पहायला मिळते.

या चॅनेलवरील ॲकर आणि तज्ञ म्हणून आलेले लोक याची त्या विषयावर बोलण्याची खरंच लायकी आहे का? हे एकदा तपासले पाहिजे. एखाद्या धार्मिक विषयावर चर्चा करण्यासाठी ज्या साधू संत, किंवा मौलवीला बोलावले जाते, तेव्हा त्याची खरंच लायकी आहे का? ज्याला त्यांच्याच समाजात स्थान नाही अशी लोक पैसे देऊन बसवली जातात आणि टीआरपी वाढवण्याचा धंदा या चॅनेलने सुरू केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. हिंदी, इंग्रजी चॅनेलच्या तुलनेत मराठी माध्यमामांची पत्रकारिता चांगली आणि सामाजिक विषय मांडण्यात अजूनही अग्रेसर आहे.

पण केवळ टीआरपी हे उदिष्‍ट डोळ्यासमोर ठेवून ज्या इंग्रजी, हिंदी चॅनेलचे काम सुरू आहे, त्यांना धडा शिकवण्याठी असे पाऊल उचलण्याची आता गरज निर्माण झाली आहे. जोपर्यंत आपण हे करत नाही, तो पर्यंत हे लोक सामान्यांच्या प्रश्नाकडे वळणार नाहीत. प्रत्येकाने असे पाऊल उचलले तर न्यूज चॅनेलला पुन्हा लोकांच्या जीवन-मरणाशी निगडीत प्रश्न घेऊन चर्चा कराव्या लागतील, अशी अपेक्षाही इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com