मला चक्रव्यूह भेदता येते.. पंकजा मुंडेंचा विरोधकांना इशारा...

सावरगाव घाट (ता. पाटोदा) या राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मगावी यंदा कोरोनामुळे ऑनलाईन दसरा मेळावा झाला. यात पंकजा मुंडे यांनी आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली.
pankaja munde dasra melawa rally news
pankaja munde dasra melawa rally news

बीड : मला तोडण्याचा प्रयत्न झाला, मी राजकारण सोडलं, घरात बसले असा अपप्रचार करण्यात आला. मात्र,  मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन. अभीमन्यूला अर्धज्ञान असल्याने तो चक्रव्युवाहत अडकला. मात्र, मला चक्रव्युह तोडता येते, असा हल्लाबोल करतांनाच हा मेळावा एकदिवस शिवतिर्थाव घेणार, असा निर्धार भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला.

राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे ऑनलाईन मेळावा झाला. यावेळी खासदार भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर, भिमराव धोंडे, रमेशराव आडसकर, अक्षय मुंदड, केशव आंधळे आदी उपस्थित होते. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, नुकसानभरपाईपोटी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे स्वागत व अभिनंदन. मात्र, हे पॅकेज पुरेसे नाही, एवढ्या मदतीने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार नाही,मायबाप सरकारने उदारता दाखवावी, अन्यथा रस्त्यावर उतरु. ऊसतोडणी कामगारांच्या संघटना आपल्यासोबतच असून दोन बैठकांत मिटणारा प्रश्न दोन महिने का लांबला. मुंबईत बसून निर्णय होत नाहीत तर ढाब्यावर बसून होतात का, असा सवालही त्यांनी केला.

आपली खासदार शरद पवार, जयंत पाटील, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासोबत चर्चा झाली असून पुढेही करु. ऊसतोड कामगारांच्या घामाची जाण आहे. त्यांना लाचारी नको, स्वाभीमान म्हणून आपण ऊसतोडणीस जा म्हणून सांगीतले. लोक बैठकीनंतर बघू म्हणतात. तुमचा आकडा सांगा, पक्षाचे पत्रक काढून, दौरा करुन काय झाले, असा सवालही त्यांनी पक्षविरोधकांना केला. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर काम करणाऱ्यांना युपीत पाठवू असा टोला लगावतांनाच तुमच्या २७ तारखेच्या बैठकीनंतर मी काय ते ठरवेल, असा इशारा दिला.

माझ्या पराभवामुळे लोक आणि कार्यकर्त्यांची पराभवाची मोठी भावना आहे. मात्र, पराभव दिवंगत मुंडे साहेब जाण्याइतका तर वाईट नाही ना, आपला पराभव करता येत नसल्याने आपल्यात विसंवाद घडवून पराभवाचे प्रयत्न केले जात असल्याचे सांगत वज्रमुठ आवळा, मागे वळून पाहणार नाही, अशी शपथ घ्या, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. 

मला राष्ट्रीय सचिवपद दिले असले तरी ही एक संधी आहे. मात्र, मी बीडची भुमिपुत्र असून हीच माझी कर्मभूमी आहे. मी महाराष्ट्रात लक्ष घालणार आहे. पुर्वी निधीचा पाऊस पाडला आता रस्त्यावर उतरुन जाब विचारु असे म्हणत सरकारच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याची दानत असल्याचेही पंकजा मुंडे यांनी नमूद केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com