जिल्ह्यातील `या` नेत्यांचे पुनर्वसन काॅंग्रेस-राष्ट्रवादी कसे करणार?

जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्यासर्वच दिग्गज नेत्याचा पराभव झाल्याने त्यांच्या पुर्नवसनाचा विषय कायम चर्चेत येत असतो, त्यात राष्ट्रवादी कडुन माजी आमदार राहुल मोटे, काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व बसवराज पाटील यांना बळ देण्याचा विचार या घडीला पक्ष करेल अशी भावना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडुन व्यक्त होत आहे.
osmanabad congress -ncp back foot news
osmanabad congress -ncp back foot news

उस्मानाबाद ः सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीकडुन लवकरच महामंडळावरील नियुक्त्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्याना यामध्ये स्थान मिळणार का याची चर्चा आतापासुनच सूरु झाली आहे.काँग्रेस व राष्ट्रवादीचा विधानसभेमध्ये जिल्ह्यामध्ये एकही सदस्य नसल्याने त्यांना या माध्यमातुन शक्ती मिळणार का? तसेच नाराज असलेल्या शिवसेनेच्या प्रा.तानाजी सावंत यांना नवीन कोणती जबाबदारी पक्ष देणार का? याची उत्सूकता त्यांच्या समर्थकांना लागली आहे.

जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सर्वच दिग्गज नेत्याचा पराभव झाल्याने त्यांच्या पुर्नवसनाचा विषय कायम चर्चेत येत असतो, त्यात राष्ट्रवादी कडुन माजी आमदार राहुल मोटे, काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व बसवराज पाटील यांना बळ देण्याचा विचार या घडीला पक्ष करेल अशी भावना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडुन व्यक्त होत आहे.

हे तिन्ही माजी आमदार सध्या काही उपक्रम वगळता कुठेही चर्चेत दिसत नाहीत. पक्षीय पातळीवरही मोठ्या अडचणीचा सामना त्यांना करावा लागत असल्याचे चित्र आहे. तर जिल्ह्यात तीन आमदार व एक खासदार असल्याने शिवसेनेची पकड अधिक घट्ट होत  आहे. सध्या पक्षावर नाराज असलेले आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या बाबतीत देखील लवकरच महत्वाचा निर्णय होऊ शकतो,  अशीही चर्चा आहे.

शिवसेनेचे पालकमंत्री सध्या पक्षाच्या नेत्याना बळ देण्यासाठी पाऊले उचलत असल्याचे दिसते..शिवसेना सोडली तरी इतर पक्ष काहीसे प्रवाहाच्या बाहेर आहेत. ही परिस्थीती बदलायची असल्यास येथील नेत्यांना बळ देणे आवश्यक आहे, राष्ट्रवादीकडुन राहुल मोटे सारखा अनुभवी चेहरा असल्याने त्यांच्या माध्यमातुन जिल्ह्याच्या राष्ट्रवादीला पुन्हा चांगले दिवस आणणे शक्य होईल अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.

अशीच काहीशी परिस्थिती काँग्रेसच्या गटात दिसुन येत आहे. शिवसेनेचे नेते प्रा. तानाजी सावंत यांची नाराजी दुर करण्यासाठी पक्षाकडुन त्याना काही नवीन जबाबदारी दिली तर ते पुन्हा जिल्ह्यामध्ये सक्रीय होतील असे बोलले जाते. सध्या बसवराज पाटील, मधुकर चव्हाण यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांवर ठोस जबाबदारी सोपवणे पक्षाला उभारी देणारे ठरू शकेल.

तर गेली अनेक वर्ष सत्ता सुत्र आपल्या हाती ठेवलेल्या राष्ट्रवादीला देखील नव्या नेतृत्वाला बळ द्यावे लागणार आहे. महामंडळ, समित्यांवर नियुक्ती बरोबरच या नेत्यांना संघटनेचे मोठी जबाबदारी देऊन त्यांना सक्रीय केल्यास महाविकास आघाडीतील या पक्षांना निश्चितच उभारी मिळू शकेल.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com