उध्दव साहेबांचा मला पाठिंबा; आता निर्णय व्हायचाय तो खासदार खैरे यांचाच  - हर्षवर्धन जाधव 

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
 उध्दव साहेबांचा मला पाठिंबा; आता निर्णय व्हायचाय तो खासदार खैरे यांचाच  - हर्षवर्धन जाधव 
Khaire-Jadhav

औरंगाबाद :  "माझ्या वडीलांच्या गौरव ग्रंथ  प्रकाशनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कन्नडला आले, तेव्हाच माझा निर्णय झाला होता. साहेबांनी कन्नडला येऊ नये यासाठी खैरे यांनी अनेक कारणे सांगितली. साहेब गर्दी जमणार नाही, लोक येणार नाहीत असे सांगून दिशाभूल केली."

"पण उध्दव साहेबांनी सगळ्यांचा विरोध झुगारून कन्नड येथील कार्यक्रमाला हजेरी लावली. माझा निर्णय खऱ्या अर्थाने त्याच दिवशी झाला," आता निर्णय व्हायचाय तो खासदार खैरे यांचाच अशी खोचक प्रतिक्रिया आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सरकारनामाला फोनवरून दिली.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. बुधवारी (ता.18) कन्नड येथे पत्रकार परिषद घेऊन हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून यावेळी नवा चेहरा द्या अशी मागणी करत खैरे यांच्या नावाला विरोध दर्शवला. त्यानंतर खैरे विरुध्द जाधव या वादाला नव्याने सुरूवात झाली.

यावर चंद्रकांत खैरे यांनी 'उध्दव ठाकरे माझा नाही तर हर्षवर्धन जाधव यांचाच निर्णय घेतील' असे म्हणत जाधव यांच्या विधानाचा समाचार घेतला होता. खैरे यांचे विधान आमदार जाधव यांच्या चांगलेच जिव्हारी लागले. लगोलग त्यांनी फोन करून आपली भूमिका स्पष्ट केली.

साहेबांचा मला पाठिंबा...
"स्व. रायभान जाधव यांच्यावरील गौरव ग्रंथ   प्रकाशनाचे निमंत्रण मी मुंबईला जाऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिले होते. पण साहेबांनी कन्नडच्या कार्यक्रमाला येऊच नये यासाठी खैरे यांच्यासह इतरांनी बरेच प्रयत्न केले. पण साहेबांनी सगळ्यांना डावलून कन्नडला येण्याचे ठरवले आणि ते आले. त्यामुळे उध्दव साहेबांचा मला पाठिंबा आहेच ",असा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in