पालकमंत्री नवाब मलिक जिल्ह्याचे पालक्तव विसरले.. - Guardian Minister Nawab Malik forgot the guardianship of the district. | Politics Marathi News - Sarkarnama

पालकमंत्री नवाब मलिक जिल्ह्याचे पालक्तव विसरले..

गणेश पांडे
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

राज्यकर्त्यामध्ये संवेदना शिल्लक असतील तर ते शेतकऱ्यांच्या मागण्याचा तातडीने विचार करतील, परंतू असे दिसत नाही.  पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व आहे. परंतू त्यांना ही शेतकऱ्यांच्या संवेदना समजलेल्या दिसत नाही. त्यांना त्यांच्या पालकत्वाचा विसर पडला आहे. त्यामुळेच त्यांनी जिल्ह्यातील प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही बोर्डीकर यांनी केला. 

परभणी ः जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आहेत, त्यांना सरसगट आर्थिक मिळून देण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. परंतू अश्या परिस्थितीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री पालकत्व विसरलेत, असा टोला भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी  लगावला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नानांवर भाजपने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी बोर्डीकर यांनी पालकमंत्र्यांवर निशाणा साधला.

शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत मिळावी या प्रमुख मागणीसाठी भाजपच्या  आमदार मेघना बोर्डीकर यांना सोमवारपासून उपोषण सुरू केले  आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस असूनही राज्यशासन किंवा प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही. या संदर्भात पत्रकारांशी बोलतांना बोर्डीकर म्हणाल्या, भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. हा विषय येत्या दहा दिवसात मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. परंतू माझी प्रमुख मागणी असलेल्या सरसकट आर्थिक मदती विषयी ते काहीच ठोस बोलायला तयार नाहीत.

राज्यकर्त्यामध्ये संवेदना शिल्लक असतील तर ते शेतकऱ्यांच्या मागण्याचा तातडीने विचार करतील, परंतू असे दिसत नाही.  पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व आहे. परंतू त्यांना ही शेतकऱ्यांच्या संवेदना समजलेल्या दिसत नाही. त्यांना त्यांच्या पालकत्वाचा विसर पडला आहे. त्यामुळेच त्यांनी जिल्ह्यातील प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही बोर्डीकर यांनी केला. 

परभणीला सापत्न वागणुक का ?

अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या महसुल मंडळांना पंचनाम्यातून वगळण्यात आले. हाच प्रकार बीड जिल्ह्यातील काही तालुक्यात झाला. परंतू तातडीने बीड जिल्ह्यातील महसुल मंडळांना यादीत समाविष्ठ करण्यात आले. बीडलाही राष्ट्रवादी कॉग्रेसचे पालकमंत्री आहेत व परभणीलाही, मग परभणी जिल्ह्याला सापत्न वागणुक का दिली जात आहे ? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, आज पीक कर्ज वाटपासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांच्या व्यवस्थापकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील कर्जवाटपाचा आढावा घेतला जाणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख