मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात शंभर उद्योजक आणि पदवीधरांना रोजगार हेच ध्येय..

महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शिक्षक,पदवीधरासाठी कुठेलच ठोस कामे केली नाही. केवळ संस्थाचालकांमध्ये भांडणे लावून आपला स्वार्थसाधला. एवढेच नाही तर विद्यापीठात घाणेरडे राजकारणही त्यांच्याकडून केले गेले.पदवीधरांनी मला संधी दिली तर केवळ पदवीधराचेच काम करेन, प्रत्येक जिल्ह्यात शंभर उद्योजक तयार करण्याचा आराखडा राबवून मराठवाड्यातील पदवीधरांच्या हाताला काम कसे मिळेल, यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत,
Bjp Graduate Election Candidate Boralkar press news Aurangabad
Bjp Graduate Election Candidate Boralkar press news Aurangabad

औरंगाबाद: पदवीधर मतदार संघाच्या प्रचारासाठी मराठवाड्यातील ७६ तालूक्यांचा दौरा केला. यात पदवीधरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या संपुर्ण दौऱ्यात पदवीधर मतदारांमध्ये महाविकास आघाडी सरकार आणि विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार यांच्या विषयी संताप दिसून आला. या आमदारांनी पदवीधरांचे प्रश्न सोडवण्या ऐवजी शिक्षण संस्था चालकांमध्ये भांडणे लावली. ज्या शिक्षण मंडळाचा कारभार ते पाहतात त्यातील नोकरभरतीमध्ये प्रचंड गैैरप्रकार झाल्याचा आरोप भाजप महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी केला. ही सगळी प्रकरणं आपण आमदार झाल्यावर समोर आणणार असल्याचेही बोराळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस. या निमि्तातने भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी आपल्या प्रचार कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी गेल्या दोन आठवड्यांपासून मराठवाड्यात केलेल्या प्रचारा दरम्यानची माहिती देतांनाच त्यांनी विरोधी आघाडीच्या उमेदवारावर देखील टिका केली.

बोराळकर म्हणाले,  विद्यामान आमदाराने गेल्या बारा वर्षात बारा प्रश्‍नही सोडविले नाहीत. सीए, वकील, कोणत्याच घटकासाठी त्यांनी काम केले नाही. कोरोना काळात ३० शिक्षकांचा मृत्यु झाला, त्या  शिक्षकांनाही कोरोना वॉरियर म्हणून ५० लाख रुपयांचे सुरक्षा कवच देण्याची मागणी मी निवेदनाव्दारे राज्य सरकारकडे केली होती. मात्र सरकारने काहीच केले नाही. कुठलेच पॅकेज या शिक्षकांना दिले नाही.

विना अनुदानित शिक्षकांचा प्रश्न आम्ही सोडवला होता. पण महाविकास आघाडी सरकराने त्या निर्णयाला स्थगिती दिली. बारा वर्ष पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी मात्र यासाठी काहीच केले नाही. कोरोना काळात वकीलांचे उत्पन्न पुर्णपणे बंद झाले होते.  त्यांना पाच हजार रुपयांचे पॅकेज जाहीर करा, अशी मागणी देखील आम्ही सरकारकडे केी होती. पण त्याकडेही दुर्लक्ष केले गेले. 

दोन टर्म पदवीधरांचे प्रश्न सोडवल्याचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शिक्षक,पदवीधरासाठी कुठेलच ठोस कामे केली नाही. केवळ संस्थाचालकांमध्ये भांडणे लावून आपला स्वार्थ त्यांनी साधला. एवढेच नाही तर विद्यापीठात घाणेरडे राजकारणही त्यांच्याकडून केले गेले. पदवीधरांनी मला संधी दिली तर केवळ पदवीधराचेच काम करेन, प्रत्येक जिल्ह्यात शंभर उद्योजक तयार करण्याचा आराखडा राबवून मराठवाड्यातील पदवीधरांच्या हाताला काम कसे मिळेल, यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत, असेही बोराळकर यांनी सांगितले.

 जयसिंगरावांसाठी अनेक वर्षे वाहून घेतले..

जयसिंगराव गायकवाड यांच्या निवडणूकीचा मी प्रमुख होतो. त्यासाठी वेळ,पैसे खर्च केले. अख्खे कुटुंब त्यांचे काम करत होते, कायम त्यांच्यासाठी मी व माझे कुटुंब तत्तपर असायचो. कुठलाही स्वार्थ न बाळगात त्यांच्यासाठी खस्ता खाल्या. ते आमचे नेते होते, पण आज आमच्यावरच ते आरोप करतात याचे वाईट वाटते. 

भाजपमध्ये पैसेवाल्यांना तिकीट मिळते असा अरोपही गायकवाड यांनी केला, पण स्वतः गायकवाड हे भाजपकडून आमदार, खासदार, केंद्रात व राज्यात मंत्री होते. तेव्हा त्यांना कुणी पैसे मागितले होते का? त्यांनी उमेदवारीसाठी कधी पैसे दिले का? असा उलट सवाल देखील बोराळकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com