राजकारणात भविष्य ज्याचे त्यालाच घडवावे लागते.. रावसाहेब दानवेंचा कानमंत्र - The future in politics which he has to shape | Politics Marathi News - Sarkarnama

राजकारणात भविष्य ज्याचे त्यालाच घडवावे लागते.. रावसाहेब दानवेंचा कानमंत्र

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

राजकारणामध्ये कुणालाच भविष्य नसते, ते ज्याचे त्यालाच घडवावे लागते, असा कानमंत्र केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिला.

औरंगाबाद ः राजकारणामध्ये कुणालाच भविष्य नसते, ते ज्याचे त्यालाच घडवावे लागते, असा कानमंत्र केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिला. केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती ग्रामीण भागात, गावोगावी जाऊन द्या, आणि त्याचा लाभ त्यांना मिळवून द्या, असे आवाहनही दानवे यांनी यावेळी केले.

गेल्या महिन्यात शहर व ग्रामीण भागातील भाजयुमोची कार्यकारणी जाहीर करण्यात आली होती. परंतु कोरोनामुळे या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले नव्हते. आज प्रातिनिधिक स्वरुपात या पदाधिकाऱ्यांना रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

देशात सर्वाधिक काळ सत्ता असलेला काॅंग्रेस हा पक्ष एका परिवाराचा पक्ष म्हणून ओळखला जातो. गांधी परिवाराचा पक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. भाजप मात्र कुण्या एका व्यक्तीचा पक्ष नाही, तर तो सगळ्यांचा आणि एका कुटुंबा प्रमाणे आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला भाजपमध्ये निश्चितच न्याय मिळतो, पण त्यासाठी आपली योग्यता सिध्द करावी लागते. राज्यात सध्या तीन पक्षांचे अमर-अकबर-अॅन्थनीचे सरकार असल्याचा पुनरुच्चार करत या सरकारच्या विरोधात एकत्रित येण्याचे आवाहन देखील दानवे यांनी यावेळी केले.

भाजयुमोची कार्यकारणी अशी

शहर उपजिल्हाध्यक्ष- अॅड. अक्षय बाहेती, अमोल झळके, समीर लोखंडे, मयुर वंजारी, श्रीकांत घुलेशैलेश हेकाडे, बाबासाहेब मुळे, पवन सोनवणे, बंटी चावरिया, सतीश ताठे, बाबासाहेब गवळी, संग्राम पवार, सतीश खेडकर, मयुर महाकाल, अप्पासाहेब हिवाळे, गीतेश पाटील, भीमा धर्मे, राजेश देशमुख, स्वामी दुबे.

शहर जिल्हा सरचिटणीस- राहुल रोजतकर, महेश राऊत, पंकज साकला, दिपक खोतकर, राहुल नरोटे.

शहर जिल्हा चिटणीस- विजय बरस्वामवर, कुणाल गील, बाबासाहेब वेताळ, धीरज वर्मा, अमोल तांबे, स्वप्नील पारेख, तेजस व्यवहारे, रोहितकुमार साबळे, यज्ञेश बसय्ये, सुरेश जुये, सागर प्रसाद, दत्ता कापडे, गिरीश बांगर, सुभाष तांगडे, मुकेश चित्रक, महेश केदारे, विनोद बनकर, श्रेयस पाठक, गौरव गोराले.

कोषाध्यक्ष- मच्छिंद्र औताडेसहकोषाध्यक्ष- राजू राठोडसोशल मिडिया- प्रसिध्दी प्रमुख- प्रथमेश दुधगांवकर, सहप्रमुख- रोहित सोनवणेविद्यार्थी आघाडी संयोजक- सौरभ शिंदेमंडळ अध्यक्ष- सुनील वाणी, योगेश भाकरे, अक्षय म्हात्रे, बंडू ठुबे, राहुल दांडगे, अजय पारेख, राम पेरकर.

Edited By : Jagdish Pansare

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख