आरोग्य विभागाचे चार कर्मचारी निलंबित; सीईओच्या कारवाईने खळबळ...

अनेक ठिकाणी कर्मचारी गावात न राहता नांदेडला राहत असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यातच ठाकूर यांनी आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांची यांची बैठक घेऊन प्रत्येकाने आपापल्या नियुक्तीच्या ठिकाणीच वास्तव्यास रहावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांच्या या सूचना फारसे गांभीर्याने न घेणे कर्मचाऱ्यांना चागंलेच महागात पडले आहे.
Nanded ceo varsha thakur news
Nanded ceo varsha thakur news

नांदेड : महिनाभरापुर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेल्या वर्षा ठाकूर यांनी कोरोनाच्या काळात कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आरोग्य उपकेंद्रातील चार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला. अर्धापुर तालुक्यातील उपकेंद्रांना अचानक भेटी दिल्या, तेव्हा साडेचार वाजताच कुलूप लावून कर्मचारी निघून गेल्याचे निदर्शनास आले. तर अन्य एका ठिकाणी एकही कर्मचारी हजर नव्हता. या प्रकाराने संतप्त झालेल्या वर्षा ठाकूर यांनी या दोन्ही उपकेंद्रातील चार जणांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.

जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णांची संख्या पाहता शासकीय यंत्रणा अलर्ट आहेत. शहरा प्रमाणेच ग्रामीण भागात देखील कोरोना फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ते रोखण्याचे मोठे आव्हान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा समोर आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाचे डॉक्टर, कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत.

एकीकडे अशा योध्यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव होत आहे, तर काही कामचुकार कर्माचाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील कोरोना लढ्यात बाधा येतांना दिसत आहे. कर्तव्यात कसुर करणाऱ्या दोन आरोग्य उपकेंद्रातील चार जणांना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी  तडकाफडकी निलंबीत करत कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा कठोर संदेश दिला आहे. या कारवाईने कामचुकार व दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

कोरोना काळात ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. तेथील डॉक्टर्स,कर्मचारी यांनी देखील रुग्णांना चांगली सेवा देण्याच्या सूचना असताना अनेक ठिकाणी डॉक्टर्स व कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान वर्षा ठाकूर यांनी गुरुवारी सायंकाळी अर्धापूर तालुक्यातील कासारखेडा व मालेगाव येथील आरोग्य उपकेंद्रांना अचानक भेटी दिल्या. यावेळी कासारखेडा येथे दुपारी साडेचार वाजता उपकेंद्राला कुलूप असल्याचे आढळून आले. तर मालेगाव येथे एकही कर्मचारी हजर नव्हता. त्यामुळे ठाकूर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

प्रत्येक उपकेंद्राला एक पुरुष व स्त्री नियुक्त (एएनएम) करण्यात आल्या आहेत. नियमानुसार या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी कर्मचारी गावात न राहता नांदेडला राहत असल्याचे समोर आले आहे.  गेल्या आठवड्यातच ठाकूर यांनी आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांची यांची बैठक घेऊन प्रत्येकाने आपापल्या नियुक्तीच्या ठिकाणीच वास्तव्यास रहावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांच्या या सूचना फारसे गांभीर्याने न घेणे कर्मचाऱ्यांना चागंलेच महागात पडले आहे. यापुढेही कामचुकार कर्मचाऱ्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशाराही ठाकूर यांनी दिला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com