शिवसेनेच्या माजी महापौरांना कोरोनाची लागण

मिशन बिगिन अगेन अंतर्गत शहरातील दैनंदिन व्यवहार काही प्रमाणात सुरळीत झाल्यानंतर अनेक कार्यक्रम, लग्न समारंभांना देखील घोडेले यांनी हजेरी लावली होती. विशेषतः आपल्या ईटखेडा वार्डात गेल्या सहा महिन्यापासून ते सक्रीय असल्याचे पहायला मिळाले. पण काही दिवसांपासून त्यांना त्रास जाणवू लागल्याने कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आला.
ex meyor ghodele corona positive news
ex meyor ghodele corona positive news

औरंगाबाद ः शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपाचार सुरू असून संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देखील घोडेले यांनी केले आहे. कोरोनाच्या काळात गेल्या सहा महिन्यापासून घोडेले आपल्या ईटखेडा वार्डासह संपुर्ण शहरात शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदत करत होते. आवश्यक ती काळजी घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली.

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर पडली, तेव्हापासून सर्वच पक्षाचे माजी नगरसेवक लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडेले हे देखील त्यात आघाडीवर होते. कोरोनाच्या काळात पक्ष, संघटनेच्या कामासह लोकांना मास्क, सॅनिटायजर, धान्य, जेवण व इतर गरजेच्या वस्तू पुरवण्यापासून शहरातील विविध वॉर्डांमध्ये निरजंतुकीकरण करण्याचा कामात घोडेले यांनी पुढाकार घेतला होता.

मिशन बिगिन अगेन अंतर्गत शहरातील दैनंदिन व्यवहार काही प्रमाणात सुरळीत झाल्यानंतर अनेक कार्यक्रम, लग्न समारंभांना देखील घोडेले यांनी हजेरी लावली होती. विशेषतः आपल्या ईटखेडा वार्डात गेल्या सहा महिन्यापासून ते सक्रीय असल्याचे पहायला मिळाले. पण काही दिवसांपासून त्यांना त्रास जाणवू लागल्याने कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आला. त्यानंतर घोडेले यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घोडेले यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच शिवसेनेसह त्यांच्या समर्थक व हितचिंतकांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फोनवरून संपर्क साधला. तसेच कोरोनातून लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेत सक्रीय व्हा, अशा शुभेच्छाही दिल्या.

चोवीस हजाराहून अधिक रुग्ण बरे..

जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे या पैकी २४ हजाराहून अधिक पुर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर सहा हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com